पुणे

परभणी,हिंगोली जिल्ह्यातील ७२ मंडळात खूप हलका ते मध्यम पाऊस

CD

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील
७२ मंडलांत हलका पाऊस

दीर्घ खंडामुळे पिके संकटात; सर्वदूर जोरदार पावसाची गरज

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ८२ पैकी ७२ मंडलांत सोमवारी (ता. २४) सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासांत खूप हलका ते मध्यम पाऊस झाला. मात्र, परभणी जिल्ह्यातील १० मंडलांत पावसाने हुलकावणी दिली. परभणी जिल्ह्यात सरासरी ५ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ८.१ मिलिमीटर पाऊस झाला.
दीर्घ खंडानंतर झालेल्या पावसामुळे काही मंडलांतील पिकांना दिलासा मिळाला असला, तरी या दोन्ही जिल्ह्यांत सर्वदूर दमदार पावसाची गरज आहे. अन्यथा खरीप पिके हाती लागण्याची शक्यता धूसर आहे.
परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यांतील ४२ मंडलांत रविवारी (ता. २३) रात्री पाऊस झाला. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ५ मिलिमीटर, ऑगस्ट महिन्यात आजवर सरासरी ४८.३ मिलिमीटर (२७.४ टक्के), तर यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ३५३.१ मिलिमीटर (६५.३ टक्के) पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यांतील ३० मंडलांत खूप हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.१ मिलिमीटर, ऑगस्ट महिन्यात आजवर सरासरी ६८ मिलिमीटर (३६.४ टक्के), तर यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ४७९.१ मिलिमीटर (८१.७ टक्के) पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (५ मिलिमीटरपेक्षा अधिक)
परभणी जिल्हा : परभणी ८.५, परभणी ग्रामीण ६, जांब ५, दैठणा ६.५, पिंगळी ७.५, गंगाखेड ११.५, राणीसावरगाव ९, पालम ३३, चाटोरी ९, बनवस १४.३, पेठशिवणी ६.५, रावराजूर २१, लिमला २१, कात्नेश्वर २२.५, चुडावा १२.५, कावलगाव ५.५.

हिंगोली जिल्हा : हिंगोली ८, नर्सी नामदेव ११.३, सिरसम ५.८, डिग्रस ५.५, माळहिवरा ५.८, खंबाळा १९.३, कळमनुरी ११.५, वाकोडी ११.५, नांदापूर ११.५, डोंगरकडा ५.३, वारंगा ५, वसमत १३.३, हयातनगर १३.३, गिरगाव १२, टेंभुर्णी १३.३, कुरुंदा ५.८, औंढा नागनाथ १३.५, येळेगाव ५.५, साळणा ९, जवळा बाजार ९.५, गोरेगाव २४.८.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT