पुणे

कमी दरामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

CD

परभणीत कमी दरामुळे
झेंडू उत्पादकांचे नुकसान

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : दसरा सणासाठी परभणी येथील बाजारपेठेत मंगळवारी (ता.२०) झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती.दर प्रतिकिलो ५ रुपयाहून कमी होऊनही शिल्लक झेंडू टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

परभणी येथील बाजारपेठेत दसरा सणासाठी सोमवारी (ता.१९) संध्याकाळ पासून झेंडूची आवक सुरु झाली होती.परभणी तसेच हिंगोली जिल्ह्यातील झेंडू उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर झेंडू विक्रीसाठी घेऊन आले होते. मंगळवारी (ता.२०) पाथरी रस्त्यावरील मार्केटमध्ये घाऊक दर प्रतिकिलो ५ रुपये होते.शहरातील विविध रस्त्यावर तसेच बाजारात सुरुवातीला झेंडूची किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० रुपये किलो दराने सुरु होती.परंतु त्यानंतर दरात घसरण सुरु झाली. दुपारी प्रतिकिलो १० ते २० रुपये दराने त्यानंतर प्रतिकिलो ५ रुपये किलोपर्यंत दर घसरले. त्यानंतर खरेदीसाठी ग्राहक नसल्यामुळे शिल्लक राहिलेला झेंडू रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यावर आली. खडकी (ता.सेनगाव) येथील लहू राठोड म्हणाले, यंदा पाऊस कमी असल्यामुळे झेंडू भिजून खराब झाला नाही. दर्जेदार उत्पादन मिळाले.दुष्काळी स्थितीत चांगले दर मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु सरासरी दहा
रुपये किलो देखील दर मिळाले नाही. त्यातून तोडणीची मजुरी,वाहतूक खर्च देखील निघाला नाही.जिल्ह्यातील तालुक्याची ठिकाणे तसेच प्रमुख बाजारपेठांच्या ठिकाणीही झेंडूला कमी दर मिळाल्यामुळे नुकसान झाल्याचे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT