एसआरआयमध्ये पारधी समाजाची नावे न वगळण्याची मागणी
कऱ्हाड, ता. ७ ः मतदार याद्या सखोल पुनरीक्षण सर्वेक्षणाने २००२ पूर्वीचे मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्याने पारधी जमातीच्या कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात येऊ नये, अशी मागणी पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे व सहकाऱ्यांनी केली. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या वेळी सातारा जिल्हाध्यक्ष कैलास पवार, यगदेश काळे व लखांड्या काळे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की जिल्हा प्रशासनाकडून अनुसूचित पारधी जमातीचे कुटुंबाचे पुनर्वसन प्रक्रिया सन २००२ पासून सुरू करण्यात आली. आदिवासी पारधी कुटुंबे वास्तव्य करून राहत असलेल्या गावी मतदार यादी मध्ये नोंदी २००६-०७ पासून झालेल्या आहेत. त्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण सर्वेक्षणात पारधी कुटुंबाच्या नोंदी २००२ च्या यादीमध्ये समावेश आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे पारधी कुटुंबांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात येऊ नयेत. पारधी कुटुंब मतदानाचे हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. पारधी कुटुंबाकडून रेशनकार्ड, आधार कार्ड, जमातीचा दाखला अथवा मिळकतीचा उतारा इत्यादी पैकी पुरावा संबंधित सर्वेक्षक यांनी स्वीकारून पारधी नावे मतदार यादीमध्ये कायम ठेवण्यात यावीत.
५५७३३
सातारा ः मतदार याद्यासंदर्भातील निवेदन नागेश पाटील यांना देताना प्रकाश वायदंडे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.