चित्रफितीतून पालकांच्या डोळ्यात अंजन
‘वायसी’त उपक्रम; संवादाचा पूल सुरू ठेवण्याचे आवाहन
सातारा, ता. ४ ः विद्यार्थी, तरुणाई मोबाइलच्या आहारी जाऊ लागली आहे. अनेकदा ते पालकांनाही जुमानत नाहीत, ते व्यसनांत गुरफटून जातील. यासाठी पालकांनी मुलांशी सातत्याने संवादाचा पूल सुरू ठेवावा, हे सांगत आणि कॉलेज बाहेर टोळक्याने फिरणारे पाल्यांचे चित्रण आणि ‘आईवर हात उचलणारी पिढी’ ही चित्रफीत दाखवत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वतीने पालक मेळाव्यात पालकांच्या डोळ्यात अंजन घातले.
विद्यार्थी कॉलेजमध्ये काय करतो. कॉलेज त्यांना काय शिकवते हे पालकांना कळावे, यासाठी शासनाच्या आदेशाने सर्वच शाळा महाविद्यालयांत पालक शिक्षक मेळावे आयोजित केले जातात. अनेक मेळाव्यांची अवस्था फक्त आदेश पाळले असेच असते. मात्र आज वायसी कॉलेजने मुले कॉलेजला गेल्यानंतर काय काय करतात, त्यातून काय होऊ शकते हे चित्र पालकांपुढे उभे केले. कॉलेजमध्ये जाऊन चांगला शिकावा, त्याने मोठे व्हावे या उद्देशाने कष्ट करून पालक मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. मात्र, अनेक मुले तासाला दांडी मारून कॉलेज बाहेर टोळक्याने फिरत राहतात. याचे चित्रीकरणच कॉलेजने पालकांपुढे मांडले.
अभ्यास सोडून घराप्रामाणे कॉलेजच्या बाहेरही मोबाइलमध्ये ती रंगून जातात हेही त्यांनी चित्रफितीतून दाखविले. हे पाहिल्यानंतर अनेक पालक मोबाइलच्या आहारी जाणारे पाल्य आणि त्यांचे पाल्यांच्या भविष्य याबाबत अंतर्मुख झाले आणि त्यांनी पाल्यांशी संवादाचा पूल बांधण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात सोशल मीडियाचे वाढते दुष्परिणाम, व्यसनाधीनतेची भीषणता, पालक-पाल्यांतील संवादाचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या घसरत्या शिस्तीवर थेट बोट ठेवत प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य नंदिनी साळुंखे यांनी नियमित अभ्यासाचे महत्त्व सांगितले.
पर्यवेक्षक एन. टी. निकम, आर. आर. खोत, सहायक पर्यवेक्षक एन. ए. पाटील, पालक प्रतिनिधी माणिक शेडगे, संजय डफळ, परशुराम वाघमारे व धनश्री धुमाळ, विद्यार्थी प्रतिनिधी शंभूराज जाधव, फिरदोस बागवान आणि यशराज हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.