पुणे

आपटे प्रशालेत समुपदेशन सभा

CD

पुणे, ता. १८ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या वर्तनातील बदल, मानसिकता आणि दैनंदिन सवयींबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष्मणराव आपटे प्रशालेत पालक समुपदेशक सभेचे आयोजन केले होते. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही सभा घेण्यात आली. प्रशालेच्या समुपदेशिका सुलक्षणा समुद्र यांनी पालकांशी संवाद साधताना मुलांमधील हट्टीपणा, मोबाईलचा अतिवापर, शिवीगाळ, पालकांचे न ऐकणे, अभ्यासातील अनास्था, व्यसनाधीनतेचा धोका, चुकीच्या सवयी यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांशी संवाद साधताना संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापक अजित गायकवाड यांनीही पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळा आणि पालक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका कविता शिंदे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT