शेवगावात रविवारी
पालकांसाठी मार्गदर्शन
शेवगाव, ता. १९ : मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबत त्यांच्यात आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि यशस्वी होण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी शेवगाव फ्रेंड्स सर्कलतर्फे पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ट्रेनर मुनव्वर जमा या सत्रात ‘मुलांना यशस्वी आणि जबाबदार कसे बनवावे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे सत्र रविवारी (ता.२३) सायंकाळी ६.३० वाजता बंधन लॉन्स, शेवगाव येथे होणार आहे. पालकांसाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त असून, मुलांचे भविष्य घडविताना पालकांची भूमिका, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, जबाबदारीची जाणीव वाढविणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक विकास करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.