पुणे

Coronavirus:कोरोनाने लावली वाचनाची गोडी!

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे शाळा, कार्यालयांना सुटी देण्यात आली असून, नेहमीच गजबजणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. पण, काही बाबतीत आपत्ती इष्टापत्ती ठरतात, त्याप्रमाणे सध्या कुटुंबात एकोपा वाढला आहे. काहींना वाचनाची गोडी लागली आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये वाचनासाठी पुस्तकांचे आदान-प्रदानही होऊ लागले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे चिमुकले घरीच थांबून आहेत. आई-बाबा त्यांना फारवेळ बाहेर पडू देत नाहीत, घरात बसून टीव्ही फारवेळ पाहिला अथवा मोबाईल हाती घेतला, तर त्यांना त्याचाही धोका वाटू लागला आहे. त्यामुळे आई-बाबा मुलांच्या हाती वाचनासाठी पुस्तके देऊ लागले आहेत. सोसायट्यांमध्ये पुस्तकांचे आदान-प्रदान वाढले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘कोरोनामुळे सुटी असल्याने कोणती पुस्तके वाचावीत, असे लोक विचारू लागले आहेत. संकटकाळी का होईना; पण पुस्तकाची आठवण लोकांना पुन्हा होऊ लागली, हे चांगले आहे. पुस्तकामुळे मुलेच काय, प्रौढांचेही भावविश्‍व विस्तारते. माणसांची मने प्रज्वलित करण्याचे काम पुस्तके करतात. अशा निराशेच्या काळात नागरिकांना पुस्तके वाचावी वाटतात, याचे समाधान वाटते.’’

बालसाहित्यकार कवयित्री डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या निमित्ताने पूर्वीचा म्हणजे कौटुंबिक एकोप्याचा आणि शांततेचा काळ प्रत्येकाला अनुभवायला मिळतो आहे. त्यामुळे आई-वडिलांनी मुलांशी संवादाबरोबर त्यांच्याशी खेळलेही पाहिजे. घरात आनंददायी वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. यातून दररोजच्या धावपळीमुळे निर्माण झालेला दुरावा सांधला जाईल. आई-बाबा पूर्णवेळ आपल्याबरोबर आहेत, याचाही आनंद मुलांना घेता येईल.’’

मुलांनो, वाचा  आणि लिहिते व्हा!
डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे लहान मुलांचे मुबलक साहित्य उपलब्ध आहे. याशिवाय, मुलांना प्रेरणा देणारी इतिहासाची पुस्तके, शिवाजी सावंत, पु. ल. देशपांडे यांचे साहित्य; नल-दमयंतीसारख्या कथा, ‘पाडस’, ‘पियूची वही’ यांसारखी अनेक पुस्तके या काळात वाचायला देता येतील. पालकांनी पुस्तक  हाती घेतले, तर मुलेही आपोआप वाचनाकडे वळतील. मुलांनी स्वत: काही लिहिण्याचा प्रयत्न करावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT