sch.jpg
sch.jpg 
पुणे

पुणे : शाळा सुरू करण्याबाबत पालक म्हणतात...

मीनाक्षी गुरव

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा कधी आणि कशा सुरू करायच्या?, याबाबत जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. जागतिक अजेंड्यावर सध्या हा विषय संवेदनशील असल्याचे मानले जात आहे. याबाबत अद्याप अनेक देशांनी निर्णयही घेतलेला नाही. असे असताना राज्य सरकार मात्र, ग्रीन झोनमधील शाळा 15 जुनपासून सुरू करण्याचा विचारात आहे. अर्थात, त्या दिशेने पावलेही उचलली जात आहेत. परंतु पालक याबाबत असंतोष व्यक्त करत आहेत.

शालेय शिक्षण विभागामार्फत ग्रीन झोनमधील शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांच्या चर्चाही होत आहेत. याबाबत पालकांना विचारले असता, पालकांनी शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रीन झोनमधील शाळा सुरू करण्याच्या या विचाराबाबत पालकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी "सकाळ'तर्फे प्रश्‍नावलीच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जवळपास बाराशेहुन अधिक पालकांनी सहभाग नोंदविला. यात पालकांना जुनमध्ये शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठविणार का? असा प्रश्‍न विचारला असता, जवळपास 57.6 टक्के पालकांनी "नाही' असे उत्तर दिले आहे. "विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत उगाचच धोका कशाला पत्करायचा', असे प्रविण लंबाते यांचे म्हणणे आहे.

धनश्री मोरेश्‍वर म्हणाल्या,""परिस्थिती खुपच धोकायदायक असून जुनमध्ये शाळा सुरू करू नयेत.'' तर शीतल बोबडे म्हणतात, ""जुन महिन्यात कोणत्याही झोनमधील शाळा सुरू करू नयेत. अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळाही लवकरच सुरू होईल. त्यामुळे दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्यात असा वाटते.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रीन झोनमधील शाळा सुरू झाल्या तरीही 32.5 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे सांगितले आहे. तर परिस्थिती पाहुन ठरविण्यात येईल, असे जवळपास 38. 2 टक्के पालकांचे मत आहे. मयुरी अदवाडे म्हणाल्या, ""संपूर्ण पुणे शहर ग्रीन झोन म्हणून घोषित होईल आणि सर्वांचे आरोग्य सुरक्षित असेल, तेव्हाच मुलांना शाळेत पाठविले जाईल.'' 

(पाय किंवा बार चार्ट करावा)
इन्फोबॉक्‍स : 
मुलांना जुनमध्ये शाळा सुरू झाल्यास शाळेत पाठविणार का?
- होय: 22.3 टक्के
- नाही : 57.6 टक्के
- अनिश्‍चितता : 20.1 टक्के

ग्रीन झोनमधील शाळा सुरू झाल्यास तुम्ही मुलांना शाळेत पाठवाल का?
- होय : 29.3 टक्के
- नाही : 32.5 टक्के
- परिस्थिती पाहुन ठरवू : 38.2 टक्के

शाळा सुरू झाल्यानंतर साधारणत: तुम्ही मुलांना कधी शाळेत पाठवाल?
- शाळा सुरू झाल्यावर लगेच : 15.4 टक्के
- काही दिवस वाट पाहून : 41.5 टक्के
- किमान एक किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यांनी शाळेत पाठविणे टाळू : 43.1 टक्के

पालक काय म्हणतात ते पहा :
- शाळा सुरू करणे हे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणे आहे.
- ऑगस्टपर्यंत शाळा सुरू करू नयेत
- कोरोनावर औषध किंवा लस येईपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात
- लहान मुले सोशल डिसटन्स पाळू शकणार आहेत का
- शाळांमध्ये आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणा नाही
- ग्रीन झोनमधील शाळा सुरू करण्याचा विचार असला, तरीही त्याबाबत पुर्नविचार व्हावा
- शाळा ग्रीन झोनमध्ये असल्या तरीही मुलेही रेड आणि ऑरेंज झोनमध्ये असू शकतात ना!  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT