marrage 
पुणे

पोलिसांनी आणखी काय करायचे? वऱ्हाडी नव्हते, मग नवरीचे मामाही झाले... 

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : लॉकडाउनच्या काळात अनेक ठिकाणी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडत असून, पोलिस बांधव हे पालकत्वाची जबाबदारी निभावतानाही दिसून येत आहे. आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी बुद्रूक येथे एक विवाह सोहळा पार पडला. त्यात लॉकडाउनमुळे नातेवाईक उपस्थित राहू न शकल्याने पोलिस हवालदार हरिभाऊ नलावडे यांनीच वधूच्या मामाची जबाबदारी पार पाडली. 

अवसरी बुद्रूक येथील अंकुश चवरे यांचा मुलगा तुषार व वाळुंजनगर (ता. आंबेगाव) येथील कैलास शंकर वाळूंज यांची मुलगी आरती यांचा विवाह नियोजित करण्यात आला होता. साखरपुडा झाल्यानंतर लॉकडाउन असल्याने विवाह सोहळ्यास अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, दोन्हीही कुटुंबीयांनी अवसरी बुद्रूक येथे विवाह करण्याचे ठरविले. या विवाह सोहळ्याबाबत मंचर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले होते. लॉकडाउन असल्याने अनेक नातेवाईक उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे हवालदार हरिभाऊ नलावडे यांनी विवाह सोहळ्यात वधूच्या मामाची जबाबदारी पार पाडली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मामा बनण्याचा मान मिळालेले पोलिस हवालदार हरिभाऊ नलावडे यांचे परिसरात कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्यात सर्व नियमांचे काटेकोर पालन करत सर्वांनी तोंडाला मास्क लावून अवघे सहा व्यक्ती व गुरुजी यांच्या साक्षीने तुषार व आरती यांचा विवाह पार पडला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT