Garden 
पुणे

पुण्यातील उद्यानांबाबत आहे महत्त्वाची बातमी; सुरु की पुन्हा बंद?

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना रुग्ण वाढतानाच मृत्यू कमी होत नाहीत; तेव्हा उद्याने उघडून काय साधायचे आहे? असा प्रश्‍न करीत सगळी उद्याने पुन्हा बंद करा, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यामुळे ३१ उद्याने पुन्हा बंद होण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे, उद्याने सुरू करण्याबाबत महापालिकेचे उद्यान खातेही फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. यांसदर्भातील निर्णय मंगळवारी (ता. १६) होऊ शकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यातील नागरिकांना काही सवलती देताना विविध भागांतील ३१ उद्याने सुरू करण्यात आली आहेत. त्यात प्रवेश देताना काही बंधने घातली आहेत. तरीही, नागरिकांकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे; तर उद्यानात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. आधीच अपुरे कर्मचारी असताना गरजेच्या नसलेल्या बाबींना प्राधान्य नको, अशी भूमिका घेत उद्याने बंद करण्याचा आग्रह मोहोळ यांनी धरला आहे. तसे पत्रही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना देऊन आदेश काढण्याची मागणी लावून धरली आहे.

या पार्श्‍वभूमीवर उद्यान खात्यातील अधिकाऱ्यांसह चर्चा करून मंगळवारी निर्णय घेतला जाणार आहे. मोहोळ म्हणाले, ‘‘कोरोनाला रोखण्यावर उपाय केले जात आहेत. तेव्हा ज्या ठिकाणी गर्दी होईल, ती सुरू करणे सुरक्षित नाही. उद्यानांत लहान मुले आणि ज्येष्ठ मोठ्या प्रमाणात येतात; मात्र त्यांनाच उद्यानात प्रवेश नाही; त्यामुळे ती सुरू करू उद्देश साध्य होणार का? त्याचवेळी आरोग्य यंत्रणेशी जोडलेले उद्यान खात्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना मूळ काम करावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य खात्याचा ताण वाढला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : ८ चेंडूंत ३ विकेट्स! अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड अपयशी... जेकब डफीने सामन्याला दिली 360 डिग्री कलाटणी

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

Pune Crime : देवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार; भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Balapur Crime : दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT