Sharad Pawar Sakal
पुणे

Sharad Pawar : राजकारणात महिलांची संख्या वाढायला हवी - शरद पवार

Women In Politics : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित यशस्विनी सन्मान सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाल्यानंतर महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत, हे नेहमी सिद्ध झाले आहे. आज विविध क्षेत्रात महिलांची संख्या वाढत असली तरी राजकारणात आणि विशेषतः संसदेत व विधिमंडळात महिलांची संख्या अद्यापही कमी आहे. त्यांच्या संख्येत वाढ व्हायला हवी,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते व यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित यशस्विनी सन्मान सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनु आगा, माजी खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.

या वेळी सहा महिलांना ‘यशस्विनी सन्मान’ प्रदान करण्यात आला. कलावती सवंडकर यांना ‘कृषी सन्मान’, मीनाक्षी पाटील यांना ‘साहित्य सन्मान’, राजश्री गागरे यांना ‘उद्योजिका पुरस्कार’, रुक्मिणी नागापुरे यांना ‘सामाजिक सन्मान’, श्रद्धा नलमवार यांना ‘क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ आणि संध्या नरे-पवार यांना ‘पत्रकारिता सन्माना’ने गौरविण्यात आले.

पवार म्हणाले, ‘‘महिला आरक्षणाचा कायदा मंजूर झाल्यामुळे २०२९ पासून तरी संसदेत महिलांची संख्या वाढायला हवी. आम्हा सगळ्या भावंडांना आईने शिकवले, पदवीधर केले. सात मुलांपैकी तीन मुलांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण सन्मान मिळाला. एखाद्या महिलेच्या हातात सगळी जबाबदारी दिल्यावर काय होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण होते’’.

सुळे म्हणाल्या, ‘‘मुलींच्या शिक्षणाचे प्रवेश शुल्क सरकार भरणार, असे धोरण राज्य सरकारने केले होते. पण ते शुल्क जमा झालेले नाही.’’ अनु आगा म्हणाल्या, ‘‘शाळा आणि महाविद्यालयांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची यादी पाहिली तर त्यात मुलींची संख्या सर्वाधिक असते. मात्र पुढे जाऊन विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर फारशा महिला दिसून येत नाहीत. हे का होते, याचा विचार करायला हवा’’.

‘‘सध्या पुण्यात रील्ससाठी काहीही केले जात आहे. कृपया हे प्रकार थांबवा. ते केवळ गंमत म्हणून आहे, पण धोका निर्माण होईल, असे काहीही करू नका,’’ असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. मनाली भिलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर अंकुश काकडे यांनी आभार मानले.

‘सकाळ प्रकाशना’च्या पुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्र सरकारने महिला धोरणास दिलेल्या मंजुरीस तीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणारे ‘धोरण कुठंवर आलं गं बाई’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘सकाळ प्रकाशना’तर्फे या वेळी करण्यात आले. महिलाविषयक विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या १९ कार्यकर्त्यांनी या पुस्तकात धोरणाचे बारकावे उलगडून दाखवले आहेत.

‘महिलांचे आजचे प्रश्न, आव्हाने आणि भविष्यातील आव्हाने, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे’, असे सांगत ‘सकाळ प्रकाशना’च्या कार्यकारी संपादक दीपाली चौधरी यांनी या वेळी पुस्तकामागील भूमिका विशद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT