पुणे

हेड संसदीय समित्यांची फेररचना प्रलंबित

CD

नवी दिल्ली, ता. २१ (वृत्तसंस्था) : खासदारांच्या नैतिक वर्तणुकीशी संबंधित समितीसह संसदेच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांची फेररचना अद्याप प्रलंबित आहे. या समित्यांचा मागील कार्यकाळ संपून देखील त्यांची स्थापना होऊ शकलेली नाही. लोकसभेच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लोकसभेच्या कामकाजामध्ये सुधारणा सुचविणारी नियम समिती आणि खासदारांच्या निवास व्यवस्था व सुविधांवर देखरेख ठेवणाऱ्या ‘सभागृह समिती’ला अद्याप अध्यक्ष मिळू शकलेला नाही. लाभाच्या पदांशी संबंधित संयुक्त समितीची (जॉइंट कमिटी ऑन ऑफिसेस ऑफ प्रॉफिट) फेररचनाही प्रलंबित असून, ही समिती ‘कलम-१०२’ अंतर्गत एखाद्या पदावर राहिल्यामुळे खासदार अपात्र ठरतो का, याची तपासणी करते. सभागृहामध्ये सादर करण्यात येणारे विविध सरकारी दस्तावेज आणि अहवाल हे कायदेशीर तरतुदींच्या चौकटीत आहेत की नाही, याची खात्री करणारी ‘पेपर्स लेड ऑन द टेबल’ समिती आणि खासगी सदस्यांनी मांडलेल्या विधेयकांसाठी वेळ निश्चित करणारी ‘खासगी सदस्य विधेयके आणि ठराव समिती’ यांचीही फेररचना होणे बाकी आहे.

......
या समित्यांची
फेररचना प्रलंबित
- नियम
- नैतिकता
- आर्थिक घडामोडी
- रेल्वेविषयक निर्णय
- अधिकाऱ्यांची वर्तणूक
- संसदीय कामकाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Credit Card: स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेत मोठा बदल! आता ४ लाखांचे एज्युकेशन लोन मिळणार नाही; विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?

FDA School Food Rules: मुलांनो, आता वडापाव-समोसा विसरा! मुंबईतील शाळांच्या कँटीनमध्ये बदल; FDAच्या दणक्यानंतर नवा मेन्यू लागू

छ. संभाजीनगर हादरलं! 'आयफोन 15'साठी मुलाने डोंगरावरुन दिला जीव, वाचवायला गेलेल्या आई-वडिलांचाही कोसळून मृत्यू

Marathi News Live Updates : आरोपी अंकित श्रीवास्तव याच्या न्यायालयीन कोठडीबाबत दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला

Mumbai Local: मुंबईकरांच्या जीवनवाहिनीचा विस्तार खोळंबला, 'एमएमआर'मधील अनेक प्रकल्पांना ब्रेक; विलंबाचा मोठा फटका

SCROLL FOR NEXT