पुणे

पारनेर -रस्ता उदघाटन

CD

SPU26B05965
पारनेर ः बुगेवाडी रस्ता भूमिपूजन करताना सुजित झावरे. समवेत मान्यवर.


विकासकामांना निधी कमी
पडू देणार नाही ः झावरे
पारनेर, ता. २२ ः शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. एक कोटींच्या कामाबरोबरच लवकरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. याशिवाय पाणीपुरवठा योजना, संविधान भवन, सौरऊर्जा प्रकल्प, अशी विकासकामे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लावली जातील, अशी ग्वाही शिवसेना नेते सुजित झावरे यांनी दिली.
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त शहरात एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते झाले. झावरे म्हणाले, शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. शहराच्या विकासासाठी माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे अपूर्ण राहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शहराला जोडणाऱ्या वाड्या-वस्त्यांमधील सर्व रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, तालुकाप्रमुख अरुण ठाणगे, महिला आघाडी प्रमुख डॉ. कोमल भंडारी, उपजिल्हाप्रमुख प्रियांका खिलारी, आशा खोडदे, संगीता खोडदे, सुवर्णा खोडदे, स्वाती खोडदे, अनिता खोडदे, खंडू भुकन, माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
----------
झावरे यांनी तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला. पुढील काळात सर्वांनी साथ दिल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा विकास निधी आणू.
-अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: शरद पवार गटाचे आठ खासदार घेणार पंतप्रधानांची भेट; 'एफसीआरए' विधेयकासंदर्भात भूमिका केली स्पष्ट

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

Bank Closed: पुढच्या आठवड्यात 3 दिवस बँका बंद! 15 ऑगस्टला बँका बंदच, पण 'या' दिवशीही सुट्टी! पाहा संपूर्ण यादी

Woman lawyer death : वकील महिलेला पतीने पुलावरून दिलं ढकलून; 'माझ्या आईला वडिलांनी मारलं' मुलीचा गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती

SCROLL FOR NEXT