तालुका ः पारनेर
...............
DHK26A05502, DHK26A05503, DHK26A05504
पारनेर : मतदानाचा हक्क बजावताना उमेदवार खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते आणि उमेदवार राहुल शिंदे.
लंके-शिंदे लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष
१०० टक्के मतदान; चुरस मात्र शांततेत
टाकळी ढोकेश्वर, ता. २ : पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात चुरशीच्या वातावरणात १०० टक्के मतदान झाले. सर्व १०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार नीलेश लंके आणि भाजपचे उमेदवार राहुल शिंदे यांच्यात थेट लढत होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. पारनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवारी (ता. ३) होणाऱ्या मतमोजणीत पारनेरचा राजकीय गड कोण राखणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विशाल दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध कार्यकारी सेवा संस्था आणि शेतीपूरक मतदारसंघात १०० टक्के, तर बिगरशेती मतदारसंघात ९७ टक्के मतदान झाले. माजी आमदार नंदकुमार झावरे, खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, सुजित झावरे पाटील, गीतांजली शेळके, सबाजीराव गायकवाड आणि राहुल शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून पारनेर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. विविध सेवा सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार प्रयत्न केले. महिनाभरापासून मुंबई, गुहागर, शिर्डी, लोणावळा आणि पुणे येथे सहलीवर असलेल्या मतदारांना मतदानासाठी आरामदायी बसमधून आणण्यात आले. एकूण १०४ मतदारांपैकी आपल्याकडे ५५ ते ६० ठराव असल्याचे दावे दोन्ही बाजूंकडून करण्यात आले होते.
राजकीय प्रतिष्ठेची आणि अटीतटीची लढत असूनही मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मतदान केंद्राला भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्यासह १२० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
..................
माजी आमदारांचा उमेदवारांना शांततेचा सल्ला
तालुक्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान केंद्राबाहेर खासदार नीलेश लंके आणि उमेदवार राहुल शिंदे यांच्याशी संवाद साधला. या वेळी, ‘पारनेर तालुका शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत राजकीय मतभेद असले, तरी निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडा,’ असा सल्ला झावरे यांनी दोन्ही उमेदवारांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.