पुणे

नगर- पारनेरला सरसकट कर्जमाफीसाठी मोर्चा

CD

पान १६
-------------
सरसकट कर्जमाफीसह
पारनेरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा

अहिल्यानगर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, तसेच बियाणे, खते, औषधे आणि इंधनाच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी पारनेर येथे मंगळवारी (ता. २३) खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेक अटी-शर्ती लावण्यात आल्याने मोठा वर्ग लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
तसेच पीकविमा योजनेतील जाचक अटी आणि ट्रिगर पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे एक रुपयात पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, अशीही मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. शेतकरी हिताच्या विविध मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
मोर्चादरम्यान कांद्यासह अन्य शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेसह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खासदार लंके यांनी दिला.

बैलगाड्या आणि कांद्याच्या माळा
पारनेर येथे तहसील कार्यालयावर कर्जमाफीसह अन्य मागण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात ट्रॅक्टर, बैलगाडीसह शेळ्या, मेंढ्या, शेतकरी सहभागी झाले होते. खासदार लंके यांच्यासह सहभागी पदाधिकाऱ्यांनी गळ्यात घातलेल्या कांद्याच्या माळा मोर्चात अकर्षन ठरल्या.

फोटो
पारनेर, जि. अहिल्यानगर ः सरसकट कर्जमाफी करावी, कांद्याला दर द्यावा यासह विविध मागण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. (छायाचित्र ः सूर्यकांत नेटके)
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: शरद पवार गटाचे आठ खासदार घेणार पंतप्रधानांची भेट; 'एफसीआरए' विधेयकासंदर्भात भूमिका केली स्पष्ट

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

Bank Closed: पुढच्या आठवड्यात 3 दिवस बँका बंद! 15 ऑगस्टला बँका बंदच, पण 'या' दिवशीही सुट्टी! पाहा संपूर्ण यादी

Woman lawyer death : वकील महिलेला पतीने पुलावरून दिलं ढकलून; 'माझ्या आईला वडिलांनी मारलं' मुलीचा गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती

SCROLL FOR NEXT