Exam  Sakal
पुणे

बारावीच्या वेळापत्रकात अंशत : बदल

प्रश्नपत्रिका जळाल्याने वेळापत्रकात करावा लागला बदल

- मीनाक्षी गुरव

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा अवघ्या आठ दिवसांवर आली असताना या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला बुधवारी आग लागल्यामुळे यात लाखो प्रश्नपत्रिका जळून गेल्या. त्यामुळे बारावीच्या लेखी परीक्षेत अंशत: बदल करण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नियोजित वेळापत्रकातील ५ मार्च आणि ७ मार्च रोजी आयोजित केलेल्या विषयांच्या परीक्षा नियोजित तारखांएवजी आता ५ एप्रिल आणि ७ एप्रिल रोजी होणार आहेत.

राज्य मंडळामार्फत बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजित केली आहे. दरम्यान, राज्य मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाच्या बारावीच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला बुधवारी पहाटे पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ आग लागली. या आगीत पुणे विभागीय मंडळाकडे आणण्यात येणाऱ्या छपाई केलेल्या प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे जळाले. या वाहनात २५ वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे होते. यात असणाऱ्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका पुन्हा सेट करून त्यांची छपाई करावी लागणार असून त्याला काही अवधी लागणार आहेत. त्यामुळे बारावीच्या सर्वसाधारण, द्विलक्षी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नियोजित वेळापत्रकात अंशत: बदल केला आहे. त्याप्रमाणे केवळ ५ मार्च आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या विषयांच्या परीक्षांमध्येच बदल केला असून यादिवशी होणारे पेपर ५ आणि ७ एप्रिल रोजी होणार आहेत.

पेपरमध्येच करण्यासाठी त्यामुळे त्याच विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

बारावीच्या लेखी परीक्षा आणि अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल झालेला नाही. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

बारावीच्या वेळापत्रकातील सुधारित तपशील :

  • वार दिनांक : सत्र व वेळ : विषय

  • मंगळवार ५ एप्रिल २०२२ : प्रथम सत्र (वेळ- सकाळी १०.३० ते दुपारी २) : हिंदी

  • मंगळवार ५ एप्रिल २०२२ : द्वितीय सत्र (वेळ- दुपारी ३ ते सायं. ६.३०) : जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन

  • गुरुवारी ७ एप्रिल २०२२ : प्रथम सत्र (वेळ- सकाळी १०.३० ते दुपारी २) : मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, अरेबिक/देवनागरी, मल्याळम्‌, तमीळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली

  • गुरुवारी ७ एप्रिल २०२२ : द्वितीय सत्र (वेळ- दुपारी ३ ते सायं. ६.३०) : उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT