Exam  Sakal
पुणे

बारावीच्या वेळापत्रकात बदल 'अर्धमागधी’ विषयाची परीक्षा आता ८ मार्चला

‘अर्धमागधी’ विषयाचा पेपर आता ८ मार्चला होणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत(Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) इयत्ता बारावीची परीक्षा मार्च महिन्यात होत आहे. याचे परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार ७ मार्च रोजी होणारी ‘अर्धमागधी’ (Jain Prakrit) विषयाची परीक्षा आता ८ मार्च या दिवशी होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (State Board of Secondary and Higher Secondary Education)इयत्ता बारावीची परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनाही देण्यात आले आहे. परंतु ७ मार्च रोजी दुपारी तीन ते सायंकाळी साडे सहा या कालावधीत ‘अर्धमागधी’ विषयाची परीक्षा आयोजित केली होती. या ‘अर्धमागधी’ विषयाच्या वेळापत्रकामध्ये अंशत: बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ‘अर्धमागधी’ विषयाची परीक्षा आता ८ मार्च रोजी दुपारी तीन ते सायंकाळी साडे सहा या वेळेत होणार आहे. या व्यतिरिक्त बारावीच्या लेखी आणि अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळही ठरली!

Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा

Lowest Home Loan: बँक ऑफ महाराष्ट्रची 'मान्सून धमाका' ऑफर! होम लोनच्या व्याजदरात कपात आणि इतर सुविधा; मात्र 'ही' अट आवश्यक

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता मुठा नदीत 29,117 क्युसेक विसर्ग; पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा इशारा

Land Acquisition: शासकीय मनमानीला न्यायालयाचा दणका! शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी; अन्यायकारक भूसंपादन अखेर रद्द

SCROLL FOR NEXT