prime minister crop insurance scheme sakal
पुणे

PM Crop Insurance Scheme : रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते.

सकाळ वृत्तसेवा

नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते.

पुणे - नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून, शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी बागायत व जिराईत या पिकांसाठी अंतिम मुदत ३० नाव्हेंबर आहे. बागायत ज्वारीसाठी प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम ३३ हजार रुपये, जिराईत ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम ३१ हजार आहे. बागायत गहू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रुपये, हरभरा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, रब्बी कांदा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये इतकी आहे. या तिन्ही पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत विमा हप्ता भरुन सहभागी होता येणार आहे.

उन्हाळी भूईमुग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये असून, ३१ मार्च २०२३ पर्यंत सहभागी होता येणार आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी विमा कंपनी आय.सी.आय.सी.आय. जनरल लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, customersupportba@icicilombard.com या इमेल पत्त्यावर तसेच नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था, कृषी विभागाचे कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पुणे, खेड, बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी, नागरीक सुविधा केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT