pmp bus 
पुणे

पुण्यात दहा रुपयांत प्रवासासाठी ४० दिवसांची प्रतीक्षा  

सकाळवृत्तसेवा

पुणे -  शहराच्या मध्यभागात पीएमपी बसमधून दहा रुपयांत दिवसभर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किमान ४० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिका आणि पीएमपी प्रशासनात याबाबत संवाद झाला, तर ही योजना सुरू होऊ शकते. 

महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी शहराच्या मध्यभागात प्रवाशांना दहा रुपयांत प्रवास करता येईल, अशी घोषणा केली. तिची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त कार्यालयातून पीएमपीला पत्र पाठवावे लागेल. या योजनेसाठी पीएमपीवर किती रकमेचा बोजा पडेल, याचा हिशेब पीएमपीकडून काढण्यात येईल. ती रक्कम महापालिकेने देण्याची तयारी दर्शविल्यावर पीएमपीकडून या बाबतची प्रक्रिया सुरू होईल. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. दरम्यानच्या काळात महापालिका आणि पीएमपी प्रशासनातील चर्चा यशस्वी झाली तर, एप्रिलपासून प्रवाशांना दहा रुपयांत प्रवास उपलब्ध होऊ शकतो.

या मार्गांवर सुविधा  
    डेक्कन ते पुलगेट 
    स्वारगेट ते पुणे स्टेशन 
    स्वारगेट ते शिवाजीनगर (भवानी पेठ, गंज पेठ मार्गे)
    स्वारगेट- टिळक रस्ता- खजिना विहीर - अप्पा बळवंत चौक- पुणे स्टेशन - पुलगेट

दहा रुपयांत बस प्रवासाची योजना प्रवाशांना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल. 
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT