पुणे

#PunePassport  पासपोर्ट पडताळणी आठ दिवसांत

पांडुरंग सरोदे

पुणे - पोलिसांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पासपोर्ट पडताळणीसाठी (व्हेरिफिकेशन) नागरिकांना कित्येक महिने वाट पाहावी लागत होती. मात्र पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल झाल्याने ३६ ऐवजी आता अवघ्या आठ दिवसांतच पासपोर्ट पडताळणी होऊ लागली आहे. राज्यात यामध्ये पुणे पोलिस दुसऱ्या, तर नागपूर पोलिस प्रथम क्रमांकावर आहेत.

शिक्षण, नोकरी, पर्यटन, वैद्यकीय अशा विविध कारणांसाठी पुण्यातून परदेशी जाणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. मात्र परदेशात जाण्यासाठी आवश्‍यक असलेला पासपोर्ट मिळण्यासाठी नागरिकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. विशेषतः पासपोर्ट विभागाकडून वेळेत काम झाले, तरीही पोलिसांकडून होणाऱ्या पडताळणीसाठी एक-दोन महिने थांबावे लागत होते. त्यामुळे पडताळणीचे काम कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती नागरिकांना मिळत नव्हती. 

तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी पासपोर्ट पडताळणीचा कालावधी कमी करण्यास सुरवात केली. त्यांच्या कारकिर्दीत हा कालावधी ३६ वरून २२ दिवसांवर आला होता. डॉ. के. व्यंकटेशम यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीत आणखीन बदल झाला. पोलिसांनी नागरिकांना तत्काळ सेवा देण्यावर भर दिला. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. त्यामुळे ऑगस्टनंतर पासपोर्ट पडताळणी ८ दिवसांत होण्यास सुरवात झाली आहे.

मला नोकरीनिमित्त परदेशी जावे लागते. त्यामुळे आई-वडिलांच्या पासपोर्टसाठी मी अर्ज केला होता. वडिलांच्या पासपोर्ट पडताळणीचे काम सात दिवसांत झाले. आईच्या पासपोर्टची पडताळणीही लगेचच झाली. 
- सौरभ अथनीकर, कोथरूड

पासपोर्ट पडताळणीसाठी ३६ दिवस लागत होते. ऑगस्टमध्ये २२, तर आता आठ दिवसांमध्येच पडताळणी  होत आहे. महत्त्वपूर्ण बदल केल्यामुळेच हे शक्‍य झाले. हा कालावधी आणखी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त

पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करून पासपोर्ट पडताळणीचे काम ८ दिवसांवर आणले आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले, तर खरेच चांगले काम करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT