पुणे

कऱ्हाड पाटण कॉलनीतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे काय झाले

CD

पाटण कॉलनीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचे काय झाले?

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील; आमदारांनी कामाचा लेखाजोखा मांडावा

कऱ्हाड, ता. १७ ः विधानसभा निवडणुकीपूर्वी अवघ्या १५ दिवसांत पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्याला दोन वर्षे उलटली; मात्र त्या प्रश्नावर प्रत्यक्षात काय कार्यवाही झाली, त्याचा हिशोब विद्यमान आमदारांनी जनतेसमोर मांडावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी केली. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा झोपडपट्टीधारकांसाठी काय केले, त्या कामाचा लेखाजोखा देणे महत्त्वाचे असल्याचे श्री. पाटील यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर सभेत आमदारांनी निवडून आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांना त्यांच्या कायमस्वरूपी जमिनीचे हक्क मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याला दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे दोन वर्षांत नेमकी काय कार्यवाही झाली, किती बैठका झाल्या, कोणते प्रस्ताव तयार झाले आणि कोणत्या विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी सर्व माहिती जनतेला मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुढे काय झाले, त्याचा खुलासा त्यांनी करावा. झोपडपट्टीधारकासंदर्भात विद्यमान आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यात त्वरित कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाच्या पातळीवर कोणती कार्यवाही झाली, त्याची माहितीही जनतेसमोर यावी, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रश्न सुटला नसेल, तर त्यामागील कारण काय? संबंधित विभागांकडून कोणती माहिती मागविली? किती बैठका घेतल्या आणि कोणते प्रस्ताव शासनाकडे पाठविले? त्याची उत्तरे आमदारांनी द्यावीत. या जागेबाबतच्या न्यायालयीन वादाचीही स्पष्टता हवी आहे. पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांचा प्रश्न केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा नाही.

............
चौकट
............

तर स्वागतच...

पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी हक्क मिळवून देण्याचे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण झाले, तर त्यांचे स्वागतच केले जाईल. हा कोणत्याही एका पक्षाचा प्रश्न नसून, वर्षानुवर्षे तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या भवितव्याशी संबंधित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

...............

या प्रश्नांची हवीत उत्तरे...

- न्यायालयीन प्रकरणाची सध्याची स्थिती काय
- शासनाच्या कोणत्या विभागाशी पाठपुरावा केला
- मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर काय कार्यवाही झाली
- पुनर्वसनाबाबत आतापर्यंत किती बैठका झाल्या
- पुनर्वसनात कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न केले
- झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी हक्क कधी मिळणार

..................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोर्टाचा FDAला दणका! पुण्यातील दुकानदाराला ५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?

World Padel League चे गेम चेंजर्स लायन्स ठरले पहिले चॅम्पियन! ऑसी मॅव्हरिक जॅग्वार्सचा फायनलमध्ये पराभव

Digras News : उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना घरपोच नोटीस

Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या निविदेत प्रशासन एक पाऊल मागे

Pune News : आमदार सुनील कांबळे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT