पुणे

पाटण जिल्हा बॅंक विश्लेषण

CD

जिल्हा बॅंकेच्या आखाड्यातून - लोगो
पाटण तालुका...
..............................

देसाई-पाटणकरांत प्रतिष्ठेची लढत

दगाफटका टाळण्यासाठी प्रतिनिधी सहलीवर; ५३ मते घेणारा होणार संचालक

सूर्यकांत पाटणकर : सकाळ वृत्तसेवा
पाटण, ता. ५ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पाटण तालुक्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथून पालकमंत्री शंभूराज देसाई यावेळेस बॅंकेवर संचालक म्हणून जाण्यास इच्छुक आहेत. त्यांचे पारंपरिक विरोध विद्यमान संचालक सत्यजित पाटणकर व याज्ञसेन पाटणकर हेही रिंगणात आहेत. पालकमंत्र्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून, दोन्ही बाजूंकडून सावध पवित्रा घेऊन दगाफटका टाळण्यासाठी ठराव केलेले प्रतिनिधी सहलीवर पाठविले आहेत. त्यामुळे येथे काटे की टक्कर असून, कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बॅंकेसाठी पाटण सोसायटीतून भाजपचे नेते सत्यजित पाटणकर व त्यांचे बंधू याज्ञसेन पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. मागील निवडणुकीत १४ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. पाटणमधील दोन्ही गटांच्या मतदारांना सहलीसाठी पाठवण्यात आले आहे. सोसायटी मतदारसंघांमध्ये १०४ मतांची बेरीज आहे. ५३ मते घेणारा उमेदवार जिल्हा बँकेवर निवडून जाणार असल्याने सध्या दोन्ही गटांकडून संख्याबळाबाबत विविध दावे सांगितले जात आहेत.
पाटणमधून जिल्हा बँकेवर पाटणकर गटाचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी बँकेचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मात्र, त्यानंतर राजकीय समीकरणे बदलल्याने जिल्हा बँकेसह प्रमुख सत्ता पाटणकर गटाकडे गेल्याने गेली ४० वर्षे त्यांचे एकहाती वर्चस्व जिल्हा बँकेसह तालुक्यातील सहकार क्षेत्रावर राहिले आहे. सध्या जिल्हा बँकेची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहे. निवडणुकीपूर्वीच एकमेकांना शह देण्याचे काम देसाई-पाटणकर यांच्याकडून झाले आहे. ठराव झालेल्या सोसायट्यांमध्ये बँक पातळीवर ज्या सोसायटी थकबाकीदार आहेत, अशा ठराव झालेल्या सोसायट्यांवर दोन्ही गटांकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. यामध्ये पाटणकर गटाकडून १३ तर देसाई गटाकडून सात संस्थांवर उपविभागीय सहनिबंधकांकडे आक्षेप घेण्यात आले होते, तर काही ठराव पोलिस बंदोबस्तात झाले होते. काही ठिकाणी कोरमसाठी सोसायटी सदस्यांची पळवापळवी झाली होती. त्यामुळे आताही निवडणूक रंगतदार होणार, हे निश्चित आहे. निवडणुकीआधीच एकमेकांना रोखण्याचा प्रकार दोन्ही गटांकडून झाला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत काय गोंधळ घालणार? याची उत्सुकता आहे. सत्यजित पाटणकर यांना भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांकडून ताकद मिळत आहे, तर मंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणुकीत स्वतः लक्ष घातले आहे. कोणताही दगाफटका नको म्हणून त्यांची सावध भूमिका दिसत आहे.

चौकट....
चर्चा जागांची; तयारी पॅनेलची
...
पाटण तालुक्यातील नऊ जणांनी विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरले आहेत. या पाठीमागे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर पॅनेलची रणनीती दोन्ही गटांकडून दिसून येत आहे. याज्ञसेन पाटणकर, राजाभाऊ शेलार यांचा नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून अर्ज आहे, तर सत्यजित पाटणकर तसेच मंत्री शंभूराज देसाई, अशोकराव पाटील, निवृत्ती पुजारी, भागवत माने हेही सोसायटी मतदारसंघातून रिंगणात आहेत; पण खरी लढत पाटणकर-देसाईंमध्येच होणार आहे.
.................
फोटो
शंभूराज देसाई, सत्यजित पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, राजाभाऊ शेलार, अशोकराव पाटील
................................

Supreme Court : ज्ञानेश कुमार यांना तूर्तास दिलासा मात्र विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय गंभीर; केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

Tapola-Ahir Bridge Traffic Closed : तापोळा-आहिर पुलावरून वाहतूक बंद; स्काय गॅलरीच्या बांधकामामुळे नागरिकांच्या प्रवेशावर तात्काळ बंदी, कंपनीचे सरपंचांना थेट पत्र

रशियात टेस्ट ट्यूब फुटली अन् पसरला अत्यंत घातक 'न्यूमोनिक प्लेग'! २८ वर्षीय महिला टेक्निशियनचा मृत्यू; १९७ जण क्वारंटाइन

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याच्या याचिकेवर अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

'घरोघरी मातीच्या चुली' फेम रेश्मा शिंदेकडे गुड न्यूज? बेबी बम्पसोबतचे फोटो व्हायरल, चाहत्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत

SCROLL FOR NEXT