पुणे

पाटण दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती मिळावी

CD

लोणावळा, ता. ७ : मावळ तालुक्यातील पाटण येथील दरडग्रस्त नागरिकांचे सुरक्षित पुनर्वसन व्हावे, ही मागणी ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या वेळी महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

पाटण गावात काही दिवसांपूर्वी झालेल्या दरड दुर्घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत महाजन यांच्याशी चर्चा केली. भेगडे यांनी दरडीचा धोका आणि भविष्यातील उपाययोजनांची गरज अधोरेखित करत, बाधितांना तातडीची मदत व कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली
महाजन यांनी यावर तातडीने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून बाधित कुटुंबांना दिलासा देण्याच्या सूचना या वेळी त्यांनी दिल्या. दरम्यान, ‘‘पाटणमधील नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता असून, त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील,’’ असे भेगडे यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT