Sanjivani-Bokil 
पुणे

मराठी शायरीच्या विश्‍वात पाटणकरांना अढळ स्थान - कवयित्री संजीवनी बोकील

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भाऊसाहेब पाटणकर यांनी आपल्या मराठी शायरीला उर्दूचा कोणताही स्पर्श होणार नाही, याची काळजी घेतली. माझ्या मराठी शायरीला उर्दू शायरीचा अनुवाद तर दूरच; पण त्याचा वासदेखील येऊ नये, असा माझा प्रयत्न असतो, असे ते नेहमी सांगत असत. हैदराबादपासून दिल्लीपर्यंतच्या उर्दू शायरी क्षेत्रातील सर्व प्रस्थापितांच्या शायरांशी झुंज देत त्यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले, असे मत ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्‍यामची आई फाउंडेशन यांच्यातर्फे ‘भाऊसाहेब पाटणकर स्मृती’ पुरस्कार गीतकार-गायक संदीप खरे यांना निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी बोकील बोलत होत्या. भारत देसडला, प्रमोद आडकर व्यासपीठावर उपस्थित होते.

गाडगीळ म्हणाले, ‘‘भाऊसाहेबांनी मराठी शायरीच्या मुलखात केवळ आपले अस्तित्व निर्माण केले नाही, तर त्यांनी या क्षेत्रात आपले अधिराज्य गाजविले. मराठी शायरी हा साहित्यप्रकार मराठी कवींना उपलब्ध करून देत त्यांनी साहित्याचे नवे दालन खुले करून दिले. तसेच, शायरी या साहित्यप्रकाराविषयी ओढ निर्माण केली. त्यांची प्रकट मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. सृजनशील आव्हानांना सामोरे जाणे, हा त्यांच्या स्वभावाचा मोठा गुण होता.’’ खरे म्हणाले, ‘‘गझल हा एक तरल काव्यप्रकार आहे. या क्षेत्रात भाऊसाहेबांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT