पुणे

चोरीचे सत्र चालूच

CD

पाथर्डीत चोरट्यांचा धुमाकूळ
पाथर्डी, ता. ८ ः तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, एका रात्रीत घरफोडी आणि जबरी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. पिंपळगाव टप्पा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला, तर माळी बाभूळगाव येथे घराबाहेर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरट्याने जबरीने चोरून नेले. या दोन्ही प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील शकिला बबन सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी घराच्या खोलीला बाहेरून लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त करून कपाटातील ५० हजार रुपये रोख, ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि चांदीचे पैंजण असा १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या घटनेत माळी बाभूळगाव येथील आश्राबाई दिवटे या घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र जबरीने काढून नेले. यावेळी चोरट्याने घरातील सदस्य झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावल्याने कुटुंबीय तत्काळ बाहेर येऊ शकले नाहीत. आजीच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांच्या मदतीने कडी उघडण्यात आली; मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

Mumbaicha Raja: 'मुंबईच्या राजाचं' ऐतिहासिक विसर्जन होणार; मुर्ती अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट पाण्यात उतरवणार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

Vastu Tips: घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत अन् कुठे लावू नयेत? पाहा वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे नियम!

SCROLL FOR NEXT