पुणे

एक तरी ओवी अनुभवावी ।

CD

माणसाला जीवन जगताना यशस्वी होण्यासाठी एक महत्त्वाचा सद्गुण आवश्यक आहे, त्याचे नाव ‘सहनशक्ती’. ज्याला इंग्रजीत ‘पेशन्स’ म्हटले जाते. शास्त्रीय परिभाषेत या सहनशक्तीला ‘तितिक्षा’ असे म्हटले जाते. ही तितिक्षा आध्यात्मिक साधना करताना जशी आवश्यक आहे, तशी व्यवहारातदेखील आवश्यक आहे.
- यशोधन महाराज साखरे, आळंदी

साधारणतः जे लोक सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय झाले आहे, अशा लोकांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचावा, अभ्यासावा अशी समजूत आहे. ती तितकीशी योग्य नाही. त्याचे कारण म्हणजे, श्रीमद्भगवद्गीता ही मानवाची जीवनाची पथगामिनी आहे. जीवन कसे जगावे, हे सांगणारे शास्त्र आहे. जीवनामध्ये येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करणारी दीपिका आहे. त्याच रीतीने ‘ज्ञानेश्वरी’ ही श्रीमद्भगवद्गीतेवरील वार्तिक असल्याने मानवी जीवनाची मार्गदर्शिका आहे. जी जीवनाचे, जीवन जगण्याचे शास्त्र आहे, ते ज्याचे जीवन जगणे अजून शिल्लक आहे, अशा कुमारवयीन युवकांसाठी या ज्ञानेश्वरीचे वाचन अभ्यास हा दूरगामी परिणाम करणारा आहे. म्हणूनच भागवत धर्माचा क्रियान्वयित होणारा अभ्यास हा कुमारवयापासून केला पाहिजे, असे सांगितले आहे. ‘कौमारात् आचरेत् प्राज्ञः धर्मान् भागवतान् इह’ यास्तव ज्ञानेश्वरी हा ग्रंथ समाजातील सर्व वयोगटातील सर्वांना मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ आहे.
श्री ज्ञानेश्वर माउलींनी अनेक सद्गुण सांगितले आहेत. माउली फक्त सद्गुण सांगून थांबत नाहीत; तर त्याबरोबर त्यांनी ते सद्गुण अंगी कसे बाणवावेत, याचेही मार्गदर्शन केले आहे. यात श्री ज्ञानराज माउलींचे मातृहृदय दिसून येते. माणसाला जीवन जगताना यशस्वी होण्यासाठी एक महत्त्वाचा सद्गुण आवश्यक आहे, त्याचे नाव सहनशक्ती. ज्याला इंग्रजीत ‘पेशन्स’ म्हटले जाते. शास्त्रीय परिभाषेत या सहनशक्तीला ‘तितिक्षा’ असे म्हटले जाते. ही ‘तितिक्षा’ आध्यात्मिक साधना करताना जशी आवश्यक आहे, तशी व्यवहारातदेखील आवश्यक आहे. तितिक्षेची व्याख्या सांगताना श्री आद्य शंकराचार्य महान दार्शनिक ग्रंथ ‘विवेकचूडामणि’ या ग्रंथात सांगतात, ‘‘सहनं सर्वदुःखानामप्रतीकारपूर्वकम्। चिन्ताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते॥’’ याचा भाव असा, की कोणताही प्रतिकार न करता आणि मनात कोणतीही चिंता किंवा दुःख न बाळगता, सर्व प्रकारची दुःखे शांतपणे सहन करणे म्हणजे ‘तितिक्षा’ होय.
ही तितिक्षा अंगी बाणण्यासाठी काय विचार काय प्रयत्न केले पाहिजेत, आपल्या विचाराची दिशा काय असली पाहिजे, याचे मार्गदर्शन श्री ज्ञानराज माउली करतात. ‘‘सहनशक्ती जर अंगी बाणवावयाची असेल तर वरवर विचार करून चालणार नाही, तर त्याच्या करणापर्यंत गेले पाहिजे.’’ आपल्याकडे सहनशक्ती का नसते, याचे कारण माउली पहिल्यांदा सांगतात,
‘‘एथ नेणावया हेंचि कारण।
जें इंद्रियां आधीनपण।
तिहीं आकळिजे अंतःकरण।
म्हणऊनि भ्रमे ॥
अर्थात इंद्रियांना पंचविषय सेवन करण्यासाठी आवडतात व ही इंद्रिये मनाला आपल्या ताब्यात घेतात व मनाला त्या इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात प्रवृत्त करतात. ही विषयाधीनता सहनशक्ती निर्माण होऊ देत नाही. इंद्रियांना पाहिजे ते मिळालेच पाहिजे, अशी मनाची प्रवृत्ती निर्माण होते आणि पुढे जाऊन असे वाटते की जे पाहिजे ते मिळाले की सुखही झाले पाहिजे. पण तसे घडणे अशक्य आहे, त्याचे कारण म्हणजे पंच विषयांचा स्वभाव. तो स्वभाव काय आहे, हे सांगताना श्री ज्ञानराज माउली म्हणतात,
‘‘जयां विषयांच्या ठायीं।
एकनिष्ठता कहीं नाहीं ।
तेथ दुःख आणि कांहीं ।
सुखही दिसे ॥

सुखप्राप्ती आणि विषय यांच्यामध्ये नियत कार्यकारणभाव नाही, इच्छित विषय प्राप्त झाला म्हणजे सुखच होईल, असे सांगता येत नाही. कारण माउली सांगतात, ‘‘हे विषय एकनिष्ठ नाहीत, या विषयापासून कधी सुख होते, तर कधी दुःख होते.’’ याचे सविस्तर विवेचन माउली करतात,
‘‘देखें शब्दाचि व्याप्ति।
निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजती ।
श्रवणद्वारें ॥
शब्द एकच आहे, तो स्तुती रूपाने आला तर आनंद देतो पण तोच शब्द निंदा रूपाने आला तर दुःखाला कारणीभूत होतो, हे माणसाने लक्षात घेतले पाहिजे. पण, त्याचा निश्चय याच्याबरोबर उलट असतो.
‘‘या विषयांवांचूनि कांहीं ।
आणिक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा स्वभावोचि पाहीं ।
इंद्रियांचा॥
माणसाचा असा पक्का निश्चय असतो, की हे विषय अत्यंत रमणीय सुखदायी आहेत. पण, हे पंच विषय आपात रमणीय आहेत, हे माणसाने लक्षात घेणे आवश्यक आहे,
हे विषय तरी कैसे ।
रोहिणीचें जळ जैसें ।
कां स्वप्नींचा आभासे।
भद्रजाति ॥’’
हे पंचविषय हे मृगजळाप्रमाणे आहेत. जोपर्यंत आनंददायी वाटतात, पण जागेवर पोचल्यानंतर काही मिळत नाही, त्यामुळे फक्त दमछाक आणि दुःख पदरी पडते. यास्तव ‘‘सहनशक्ती अंगी बाणावी, असे वाटत असेल तर विषयासक्तीचा परित्याग केला पाहिजे,’’ असे माउली सांगतात. तारुण्यामध्ये विषयासक्ती बहरलेली असते. जर, आपल्याला सहनशक्ती हा सद्गुण प्राप्त करायचा असेल तर माउलींनी सांगितल्याप्रमाणे विषयांचे स्वरूप समजावून त्यापासून कसे परावृत्त होता येईल, याचा विचार केला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

Fine Arts BFA Admission: कला शिक्षणाच्या प्रवेश नोंदणीस रविवारपर्यंत मुदतवाढ; अभ्यासक्रमासाठी १ हजार ३७९ विद्यार्थ्यांची नोंदणी

‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात; व्हिडिओ व्हायरल!

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवासाचा खर्च किती होणार? तिकीट दर विमानांपेक्षा किती स्वस्त असणार, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT