IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

Mumbai Indians Season Review Meeting : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी झाली. त्यानंतर आता या हंगामाचा सखोल आढावा घेतला जाणार असून मुंबई इंडियन्स मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Mumbai Indians | IPL 2026

Mumbai Indians | IPL 2026

Sakal

Updated on

Mumbai Indians review meeting : इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत सर्वात निराशाजनक कामगिरी झालेल्या संघांपैकी एक म्हणजे मुंबई इंडियन्स. पाचवेळच्या विजेत्या असलेल्या मुंबई इंडियन्सला या हंगामात १४ पैकी फक्त ४ सामनेच जिंकता आले. खरंतर गेल्या ६ वर्षापासून मुंबईला विजेतेपद जिंकता आलेले नाही, त्यातच २०२४ मध्ये झालेला नेतृत्व बदल सर्वात चर्चेत राहिला.

रोहित शर्माला (Rohit Sharma) काढून गुजरात टायटन्समधून ट्रेडच्या मार्फत पुन्हा संघात घेतलेल्या हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद देण्यात आले. पण २०२४ आणि २०२६ या दोन्ही वर्षी मुंबईची कामगिरी अत्यंत घसरली. त्यातही २०२६ मध्ये संघात अनेक दिग्गज असतानाही संघाला फारशी चांगली कामगिरी करता न आल्याने बरीच टीका संघाच्या निर्णयांवर झाली. यानंतर आता मुंबई इंडियन्स मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Mumbai Indians | IPL 2026
RCB ला सलग दोनदा IPL चॅम्पियन बनवणारे कोच आता इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक? दिनेश कार्तिकचं मोठं विधान चर्चेत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com