पुणे

पुरंदरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

सकाळवृत्तसेवा

परिंचे (पुणे) : पुरंदरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला असून, मांढर (ता. पुरंदर) येथील शांताराम दिनकर मांढरे (वय ८५) असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. मंगळवार (ता. २) रोजी सकाळी दहा वाजता मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी जाहीर केले.

कोरोना रोगाची लक्षणे दिसत असून, देखील कोणतीही खबरदारी न घेता ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला असून रोग संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शांताराम मांढरे देवाचे पुजारी असून, आजारपणात देखील देवाची पूजा करत असल्याचे समजते. बुधवार (दि.२७) मे पासून मांढरे यांना खोकला, ताप, सर्दी व श्‍वास घेण्यास त्रास सुरू झाला होता. माहूर व परिंचे येथील खाजगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले होते. रविवार (दि.३१) रोजी त्यांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपचार सुरू असताना सोमवारी (दि.१) रोजी पहाटे एक वाजता त्यांचा मृत्यू झाला.मृत्युनंतर मृतदेह ताब्यात देण्याची मागणी मांढरे यांच्या कुटुंबांनी केली. स्वॅब अहवाल न आल्यामुळे मृतदेह ताब्यात देताना अंत्यसंस्कार करताना काळजी घेण्याची हमी दिल्यामुळे मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. आज मंगळवार (दि.२) रोजी सकाळी दहा वाजता या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी जाहीर केली. आजारपणाच्या काळात रुग्णाचा कुटुंबाशी अनेक दिवस संपर्क आल्यामुळे धोका वाढला आहे. हायरिक्स कॉन्टॅक्ट यादीमध्ये कुटुंबातील सहा जण असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश पवार यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. शांताराम मांढरे हे ग्रामदैवते चे पुजारी असून गावाबाहेर असलेल्या देवीच्या देवळात पूजा करण्यासाठी जातात त्यावेळी त्यांचा इतर लोकांशी संपर्क आला असल्याने कोरोना रोगाची लागण झाली असल्याचा संशय सरपंच सचिन शिंदे यांनी सांगितले.

धोका वाढण्याची शक्यता जास्त

कोरोना रोगाची लक्षणे दिसत असून देखील ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात कसा दिला असा सवाल उपस्थित केला जात आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा समोर आले आहे. रुग्णाच्या अंत्यविधीसाठी सुमारे तीस लोक उपस्थित असल्याचे समजते. त्यामुळे धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

प्रकरणाची चौकशी करणार

याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण राऊत यांच्याशी संपर्क साधला असता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना हलगर्जीपणा झाला असल्याचे मान्य करून याची चौकशी करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

आगीत घर गमावलेल्यांना मोठी मदत! आग घटनेत बेघर झालेल्यांना जमीन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय; पण नेमकं कुणाला आणि कुठे?

बायकोनं केलेला आरोप खरा ठरला? खरंच थलपती विजयचं अभिनेत्रीसोबत अफेअर? सोशल मीडियावर दोघांचा Viral Video

SCROLL FOR NEXT