पुणे

आंबेगाव तालुक्यात रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना वेळेत मिळणार : रमा जोशी

डी. के. वळसे-पाटील

मंचर : “कोरोना बाधित उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन आणण्यासाठी होणारा मनस्ताप व धावपळ थांबणार आहे. आंबेगाव तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे व  मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अंबादास देवमाने यांच्या नियंत्रणाखाली रेमडेसीवीर इंजेक्शन वितरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु झाली आहे. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही. रुग्णांना बेलेत इंजेक्शन मिळतील.” अशी माहिती आंबेगाव तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी यांनी दिली.

त्या म्हणाल्या, “आंबेगाव तालुक्यात मंचर व परिसरात सरकारी व खाजगी दवाखान्यात कोरोना बाधित अत्यवस्थ रुग्ण उपचार घेत आहेत. ज्या रुग्णाला जास्त प्रमाणात श्वास घेण्यास, तसेच खोकल्याचा त्रास होत असल्यास रेमडेसिवीर  इंजेक्शन देण्याविषयी डॉक्टरांनी सूचित केलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी सदर डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन, कोरोना पॉजिटिव्ह असल्याचा रिपोर्ट, रुग्णाचे आधारकार्डचे झेरॉक्स व इंजेक्शन आणण्यासाठी गेलेल्या नातेवाईकाच्या आधार कार्डचे झेरॉक्स घेऊन प्रथमतः  मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नोंदणी करून सही शिक्का घ्यावा. त्यानंतर मंचर शहरातील मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी जावे. योग्य किमतीत इंजेक्शन उपलब्ध होईल.”

दरम्यान गेली पाच सहा दिवस रेमडेसवीर इंजेक्शनचा अन्य तालुक्यात काळाबाजार होत असल्याच्या व आंबेगाव तालुक्यात काही खसगी दवाखान्यात गरजेपेक्षा जास्त रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली जात असल्याच्याही तक्रारी ऐकावयास मिळाल्या. प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांनी रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन तत्परतेने मिळावे म्हणून यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अवास्तव इंजेक्शन वापरावर  आळा बसेल. विशेषता  गरजू रुग्णांना योग्य दरात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील.

“आंबेगाव तालुक्यात रेमडेसिव्हर इंजेक्शन वितरण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मंचर येथील प्रमुख वितरक पारेख फार्मा यांना उपरोक्त इंजेक्शन तालुका आरोग्य अधिकारी व अधिक्षक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय यांच्या नियंत्रणाखाली  वितरण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.” अशी माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षंक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिली.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT