पुणे

‘आयुष्यमान भारत’ योजनेचा साडेचौदा लाख रुग्णांना लाभ

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत गेल्या चार महिन्यांत देशभरात साडेचौदा लाखा रुग्णांनी याचा लाभ घेतला असून, त्यासाठी १८ हजार कोटींचा खर्च केला आहे. ही योजना गरिबांना समर्पित करण्यात आली आहे. रुग्णांच्या खर्चाचा ८० टक्के भार सरकार उचलत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केले.  

कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री रुग्णालयातील खाटांचे ‘आयुष्यमान भारत’ आणि राज्य शासनाच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजनेसाठी लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नड्डा यांनी आज केले. या वेळी नॅशनल इन्श्‍युरन्स कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सह्याद्री रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त आपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, कार्यकारी संचालक डॉ. जयश्री आपटे, नॅशनल इन्श्‍युरन्स कंपनीचे रवी अय्यर, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. जयसिंग शिंदे, युनिटप्रमुख केतन आपटे, रवी धोत्रे उपस्थित होते.

नड्डा म्हणाले की, अमेरिका, कॅनडा, मेक्‍सिको या देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी संपूर्ण ७८ खाटा लोकार्पण करणारे सूर्या सह्याद्री रुग्णालय हे देशातील पहिले रुग्णालय आहे. इतर रुग्णालयांनीही यामध्ये सहभाग घ्यावा.

केंद्राची ‘आयुष्यमान भारत’ आणि राज्य सरकारची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ रुग्णांसाठी नवसंजीवनी देणाऱ्या ठरल्या आहेत. पैसे नसल्याने गरीब लोक उपचार घेत नव्हते. आता या दोन्ही योजनांमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. सूर्या सह्याद्री हे रुग्णालय समर्पित भावनेने सहभागी झाले आहे; तसेच इतरही रुग्णालयांनी सहभागी होऊन रुग्णांना उपचार द्यावेत, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

भाजप नेत्यांची दांडी
‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या पुण्यातील कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांनी दांडी मारली. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि खासदार अनिल शिरोळे यांच्यासह कोणताच पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे, शिवसेनेचे नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT