injection google
पुणे

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी पुण्यात पळापळ

इंजेक्शन उपलब्ध करण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : म्युकरमायकोसिसचे रुग्ण एकीकडे वाढत असताना, दुसरीकडे मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेल्या इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही दूर झालेला नाही. मंगळवारी दिवसभरात रुग्णालय आणि बाजारात एकही इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची दिवसभर धावपळ सुरू होती. उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करून तीन दिवस झाले, तरी देखील जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन हे इंजेक्शन रुग्णालयांना पुरवठा करण्याबाबत अपयशी ठरले असल्याचे दिसून आले आहे. (Patients Family are Stressed due to no injection of mucormycosis in pune)

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजारात असल्याचे आढळून आले आहे. हा अत्यंत खर्चिक आजार आहे. गेल्या दिवसांमध्ये पुणे शहर व जिल्ह्यात मिळून सुमारे तीनशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायाने त्यासाठी लागणाऱ्या पोस्केनॉझॉल, ॲम्पोटेरेसीन-बी आदी इंजेक्शनची आवश्‍यकता आहे. परंतु त्यांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला असून किमती देखील वाढल्या आहेत. हे विचारात घेऊन रेमडिसिव्हिर इंजेक्शनप्रमाणे या इंजेक्शनचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यास तीन दिवस होऊन गेले. अद्यापही जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे औधष दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखविण्यास सुरुवात केली आहे. तर जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे अद्यापही यावर नियोजन सुरू आहे. ही औषध उपलब्ध होत नसल्याने आज देखील जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरीत

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT