ANR26B02904
अनगर ः येथील पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी मान्यवर.
पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार
अनगर ः अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला सोलापूर शाखेच्या वतीने पर्यवेक्षक राजेंद्र डोके, विलास गुंड, महादेव पवार, बजरंग पाचपुंड, माधवी पाचपुंड व अल्मास बागवान यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक महादेव चोपडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तर मोहोळ येथील विज्ञान प्रदर्शनात यशस्वी झालेल्या जान्हवी भडकवाड, संकेत खताळ, ज्ञानेश्वरी खताळ, सोहम पासले, श्रीराज पासले यांचा तर प्रश्नमंजुषेत श्रवण यादव, उत्कर्ष माळी, अर्जुन काळे, यशराज गुंड व स्वरा भडकवाड यांनी यश मिळविले त्यांचाही सन्मान केला. यावेळी विद्यालयास मोहोळ तालुका चॅम्पियनशिपचे सन्मानचिन्ह मुख्याध्यापकाकडे प्रदान करण्यात आले. गणित प्राविण्य परीक्षेमध्ये स्वरा भडकवाड, समर्थ काळे, समीक्षा लवळे, प्रज्ञा शिंदे, प्रतीक पवार व उत्कर्ष माळी यांनी यश मिळवल्याबद्दल विज्ञान शिक्षक परमेश्वर थिटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.