Patriot Shankarao Bhagwat family working to clean and iron flag for free fifty years Independence Day sakal
पुणे

Independence Day : गेली 50 वर्ष तिरंगा ध्वज स्वच्छ व इस्त्री विनामूल्य करून देण्याचे काम करणारे देशभक्त शंकरराव भागवत

सन १९७२ मध्ये दुष्काळ पडल्यामुळे भालेराव त्यांचे मुळगाव चास – नारोडी (ता.आंबेगाव) येथून रोजगारासाठी पिंपळगाव येथे आले

डी.के .वळसे पाटील

मंचर : पिंपळगाव - खडकी (ता आंबेगाव) येथील देशभक्त शंकरराव पांडुरंग भागवत (वय ६४) हे तिरंगा ध्वज स्वच्छ धुऊन इस्त्री करून विनामूल्य देण्याची कामगिरी तब्बल ५० वर्षापासून करत आहेत. या कामासाठी मुलगा किशोर भागवत, वैभव भागवत व सून सानिका वैभव भागवत, सारिका किशोर भागवत याचीही मोलाची साथ मिळत आहे. या पिता पुत्र व सुनांच्या देशभक्तीपर सेवेचे गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

सन १९७२ मध्ये दुष्काळ पडल्यामुळे भालेराव त्यांचे मुळगाव चास – नारोडी (ता.आंबेगाव) येथून रोजगारासाठी पिंपळगाव येथे आले. त्यांनी भाड्याची खोली घेऊन इस्त्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांना पहिल्या पासूनच सामाजिक कामाची आवड होती. गावातील श्रीराम जन्मोत्सव व अन्य सामाजिक कार्यक्रमात ही त्यांचा सक्रीय सहभाग व संपर्क वाढला .

त्यामुळे इस्त्री व्यवसायात त्यांचा चांगल्यापैकी जम बसला आहे. दरवर्षी ता २६ जानेवारी व १५ ऑगस्ट ला झेंडावंदनासाठी प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, कामगार तलाठी कार्यालय, बँका, दूध संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासकीय तसेच स्वतःच्या घरावर ध्वज लावणाऱ्यांनाही विनामूल्य सेवा देण्याची कामगिरी भागवत व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या आनंदाने करतात.

महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील सुपुत्र देशभक्त हुतात्मा बाबू गेनु यांनी स्वातंत्र्यच्या लढ्यासाठी जीवाची पर्वा न करता बलिदान केले. याचा माझ्यासह सर्व देशवासीयांना सार्थ आभिमान आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याचं भाग्य मिळालं नाही ही खंत मनात सतत सलत होती. त्यामुळेच मी दरवर्षी ता १५ ऑगस्ट व ता. २६ जानेवारीला तिरंगा ध्वज स्वच्छ धुऊन इस्त्री करून विनामूल्य देत आहे. या कामाला माझ्या कुटुंबाच्या सर्व सदस्याची साथ मिळते. या कामामुळे माझ्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित होतो.

किशोर भागवत. पिंपळगाव खडकी ( आंबेगाव)

शंकरराव भागवत व त्यांचे कुटुंबीय तिरंग्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने देशसेवा करत आहेत. सतत गप्पा मारताना ही देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्मा वीरा विषयी ते सतत कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्या कामकाजाचा गावकर्यांना सार्थ अभिमान आहे.

मथाजी पोखरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT