Patus  sakal
पुणे

Pune : पाटस साखर कारखाना येत्या महिनाभरात सुरू होणार

कामगारांना उद्या पासून कामावर बोलविण्यात आले आहे

हितेंद्र गद्रे

कामगारांना उद्या पासून कामावर बोलविण्यात आले आहे

यवत : गेली तीन हंगाम बंद असलेला भीमा पाटस साखर कारखाना येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. कामगारांना उद्या पासून कामावर बोलविण्यात आले आहे. कारखाना चालू होण्याला महत्व असल्याने सभासद व कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

कर्नाटकातील निराणी ग्रुपने हा कारखाना चालवायला घेतला आहे. ग्रुपचे संचालक संगमेश निराणी, कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल, उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, कामगार संघाचे अध्यक्ष अर्जून दिवेकर यांनी आज कारखाना स्थळावरील कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. कारखान्याचे माजी अध्यक्ष दिवंगत आमदार सुभाष कुल यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर निराणी ग्रुपच्या अधिका-यांनी विविध विभागाच्या बैठका घेत कामांच्या ऑर्डर आज दिल्या आहेत. कामगारांना उद्यापासून कामावर बोलविण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्री कारखान्याच्या भोंग्याची चाचणी घेण्यात आली. भोंग्याचा आवाज उपस्थित कामगारांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॅार्ड केला आहे. एक ते दिड महिन्यात कारखाना सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आमदार राहुल कुल म्हणाले, कारखाना सुरू होत आहे याचा आनंद आहे. कामगार आणि सभासदांचे प्रश्न सोडविले जातील. कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहणार आहे. सभासदांच्या उसाचे गाळप करून उसाला योग्य दर दिला जाईल. निराणी ग्रुपला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांचे चिरंजीव सत्वशील शितोळे म्हणाले, या निर्णयाचे स्वागत करतो. खासगीला चालवायला देणे हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. उशीरा का होईना पण कारखाना चालू होणार आहे याचे समाधान आहे.

माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, कारखाना सुरू होत आहे याचा आनंद आहे. पण तो सहकारात सुरू व्हायला पाहिजे होता. सभासदांच्या १०० कोटीच्या ठेवी कारखान्यात आहेत. सभासद म्हणून त्यांच्या हक्कांची जपणूक झाली पाहिजे. भीमा कामगार संघाचे अध्यक्ष अर्जून दिवेकर म्हणाले, सभासद व कामगारांच्या हिताच्या दृष्टीने कारखाना चालू होणे महत्वाचे होते. दिवाळीच्या मुहुर्तावर आमच्यासाठी योग्य निर्णय झाला आहे. सर्व कामगारांना कामावर घेणार आहेत. कराराप्रमाणे आम्हाला थकित देणी व नियमित पगार मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT