पुणे

पवनमावळात पावसाचा विक्रम; शेतीला मात्र दिलासा

CD

सोमाटणे, ता. २९ : पवनमावळात यंदा पावसाला तब्बल महिनाभर उशिराने सुरुवात झाली असली, तरी कमी कालावधीत झालेल्या जोरदार पावसाने गेल्या वर्षाची सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस पडूनही शेतीचे फारसे नुकसान झाले नसून, पिकांच्या गरजेनुसार झालेल्या पावसामुळे सध्या परिसरातील पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात पवनमावळात कमी कालावधीत उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने मागील वर्षाचा विक्रमही मोडीत काढला आहे. पवनमावळाच्या पूर्व भागातील कासारसाई, पुसाणे आणि आढले धरण परिसरात गेल्या वर्षी एकूण ९११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा आजअखेर या परिसरात १,२०७ मिलिमीटर पाऊस झाला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत २९६ मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच, पवनमावळाच्या पश्चिम भागातील पवना आणि मळवंडी धरण परिसरात गेल्या वर्षी २,३३७ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा आजअखेर येथे २,९२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ५८३ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस पडूनही शेतीचे मोठे नुकसान झालेले नाही. उलट पिकांच्या वाढीसाठी आवश्यक त्या कालावधीत पाऊस झाल्याने भातासह इतर पिकांची स्थिती चांगली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: मोठी बातमी! ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल; पोलिसांनी स्वतः घेतली दखल

Retirement Planning: 29 व्या वर्षीच सोडलं कॉर्पोरेट जग! वडिलांसोबत सुरू केला असा 4 स्टेप्सचा रिटायरमेंट प्लॅन

DJ Sound System Issue : सणांच्या काळात डीजे, डॉल्बीला चाप लावा; पुणेकरांचे पोलिस आयुक्तांना साकडे

Maharashtra Monsoon Prediction : अपुऱ्या डांबर पुरवठ्यामुळे रस्त्यांच्या कामाचा खोळंबा

Law CET Second List : पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या यादीत ५,८१४ विद्यार्थ्यांना प्रवेश; सीईटी कक्षाची घोषणा

SCROLL FOR NEXT