फोटो ः पवन आनंद
पवन आनंदची सुरेख कामगिरी
पुणे, ता. ११ ः डीएसपी स्पोर्ट्स ॲण्ड इव्हेंट्स आयोजित डीएसपी करंडक मॉन्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पवन आनंदच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर साई सत्यम क्रिकेट क्लबने ऑरेंज आर्मी संघाचा १०८ धावांनी पराभव केला.
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना साई सत्यम क्लबने ७ बाद १९६ धावा केल्या, त्यात महत्त्वाचा वाटा चित्तरंजन रायने ३४ चेंडूंत नऊ चौकार व चार षटकारांसह केलेल्या ६९ धावांचा होता. त्याला पवन आनंदने ४७ धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. प्रभाकर गावडे व अभिनवने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना ऑरेंज आर्मी संघाचा डाव ८८ धावांत आटोपला. शुभम हरगुडेने तीन, तर विक्रांत दुबे, विशाल भैरमदगीकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. ‘सामनावीर’ हा मान पवन आनंदने मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
साई सत्यम क्रिकेट क्लब - (२० षटकांत) ७ बाद १९६ (चित्तरंजन राय ६९, पवन आनंद ४७, विक्रांत दुबे २०, अभिजित तिवारी २०, अभिनव २-२५, प्रभाकर गावडे २-३२) विजयी विरुद्ध ऑरेंज आर्मी - (१५.३ षटकांत) सर्वबाद ८८ (उमेश कोलते ३९, शुभम हरगुडे ३-६, विक्रांत दुबे २-४, विशाल भैरमदगीकर २-११, पवन आनंद १-६).
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.