Pawana-Dam
Pawana-Dam 
पुणे

पवना धरण ४२ टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. यंदा काहीशा उशिरानेच हजेरी लावणाऱ्या पावसाने अद्याप सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे पवना धरणात मागील वर्षाच्या तुलनेत १४ टक्‍क्‍यांनी पाणीसाठा कमी आहे. सध्या धरणात ४२.१८ टक्के पाणीसाठा आहे. 

पवना धरणात मुबलक पाणीसाठा असून, पाणीकपात रद्द करून नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी राजकीय नेते व नागरिकांकडून होत आहे. तथापि, पावसाच्या आगमनापर्यंत धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे अद्यापही धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने महापालिका कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या २४ तासांत ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, १ जूनपासून धरणातील पाणीसाठ्यात २८.७२ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. यंदा २९ जून रोजी खऱ्या अर्थाने पावसाला सुरवात झाली आतापर्यंत पवना धरण परिसरामध्ये १०७५ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. 

गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत धरण परिसरात १४०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सध्या धरणात ४२.१८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी ५६.३८ टक्के पाणीसाठा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT