Pawana-Dam 
पुणे

पवना धरणामध्ये ५० टक्‍के साठा

सकाळवृत्तसेवा

पवनानगर - मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 

गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी (ता. १३) धरण परिसरात ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणाची पाणीपातळी १९९२.२० फूट झाली. १ जूनपासून धरणामध्ये १३२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरण ५१.७१ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणामध्ये ४८.०१ टक्के पाणीसाठा होता. १३ ऑगस्ट रोजी धरण १०० टक्के भरले होते. या पावसामुळे भातलावणी खोळंबली आहे; परंतु पूर्ण झालेल्या भातलावणीसाठी हा पाऊस चांगला असल्याचे शेतकरी सांगतात.

कासारसाई ६० टक्के भरले
सोमाटणे - कासारसाई धरणातील पाणीसाठ्यात दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, धरण ६० टक्के भरले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पवनमावळात पावसाचा जोर वाढल्याने कासारसाई धरणाच्या पाणी पातळीत दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली. गुरुवारी दिवसभरात धरण परिसरात ३० मिलिमीटर एकूण ४०० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने धरणात उपयुक्त पाणीसाठा ९.४० दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा १०.७० दशलक्ष घनमीटर झाला असून, धरण ६० टक्के भरले आहे. पुसाणे, आढले, मळवंडी धरण परिसरातही संततधार पाऊस सुरूच असून येथे दिवसभरात ३३ मिलिमीटर तर एकूण ४७० मिलिमीटर पाऊस झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, KBCमध्येही अपयश; अखेर शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडला, बीटेक पदवीधर तरुणाला अटक

Indian Air Force : तेरा हजार फुटांवरील धावपट्टीवर ‘आयएल-७६’ हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; चीनबरोबरील ‘एलएसी’जवळ लँडिंग

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update: अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT