Pay Parking Sakal
पुणे

पुणे : भुसार बाजारात आता पाच ठिकाणी ‘पे अँड पार्क’

‘पे अँड पार्किंग’ धोरणाला दि पूना मर्चंट्स चेंबरच्या व्यापाऱ्यांनी विरोध केला होता.

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - भुसार विभागातील वाहतूक कोंडी (Traffic) दूर करणे, बाजारात येणाऱ्या वाहनांना (Vehicle) शिस्त लावण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने खासगी ठेकेदाराला पार्किंगचा (Parking) ठेका देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे समितीने काही जागा कमी करत पाच ठिकाणच्या ६१ हजार स्क्वेअर फूट जागेसाठीच पार्किंगचा ठेका दिला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा समितीने केला आहे. (Pay and Park at Five Places in Grocery Bazaar)

‘पे अँड पार्किंग’ धोरणाला दि पूना मर्चंट्स चेंबरच्या व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. बाजार समितीने दुकानासमोरील जागेतील पार्किंगमध्ये व्यापाऱ्यांना शुल्क लागू राहणार नसल्याचे जाहीर केले होते. तरीही व्यापाऱ्यांचा विरोध कायम होता. त्यामुळे विविध व्यापारी संघटनांशी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी चर्चा केली होती. त्यानुसार सर्व्हिस लेनसह इतर २७ जागा कमी करून केवळ पाच ठिकाणी ‘पे अॅँड पार्क’ योजना लागू करण्याचे ठरविले.

पार्किंगच्या निविदेनुसार पूर्वी ३२ जागांचे क्षेत्रफळ एक लाख ४९ हजार ५५९ स्क्वेअर फूट असून १२ महिन्यांसाठी ८२ लाखांची निविदा दिली होती. मात्र, आता पाच जागांसाठी ८१ हजार ३०६ स्क्वेअर फूट जागेसाठी ४४ हजार ७१ हजार ८३० रुपयांचा ठेका दिला आहे. पद्मरेखा एंटरप्रायझेस कंपनीला एक ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीसाठी हा ठेका दिला आहे.

बाजार समितीला ४४ लाख ७१ हजार ८३० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात २२ पटीने वाढ होणार आहे. तसेच बाजारातील व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे भुसारातील पाच ठिकाणी ‘पे अँड पार्क’ योजना सुरु केली आहे. दुकानासमोर वाहनचालकांकडून शुल्क वसूल केले जात नाही.

- मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : 'भारतासाठी ही स्थिती चिंताजनक, युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार'; PM नरेंद्र मोदी यांचा इशारा

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

SCROLL FOR NEXT