पुणे

समाविष्ट गावांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे : आमदार थोपटे

सकाळवृत्तसेवा

नसरापूर : पुणे महानगर प्राधिकरणाच्या वतीने शहरात मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्याबरोबरच समाविष्ट गावांमधील पिण्याचे पाणी, कचरा निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले. 

पुणे जिल्हा परिषद, भोर पंचायत समिती व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेच्या माहितीसाठी परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी थोपटे, तहसीलदार अजित पाटील, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार देवरे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, कार्यकारी अभियंता नाकाडे, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, पंचायत समिती सदस्य पूनम पांगारे, डोंगरी विकास परिषदेचे सदस्य विश्वास ननावरे, कृष्णाजी रांजणे आदी उपस्थित होते. 

थोपटे म्हणाले, "काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यशाळेबाबत काही कार्यवाही झाली नाही. या वेळी असे होऊ नये. महामार्ग पट्ट्यात प्राधिकरणाच्या कामासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्याची गरज आहे. त्यासाठी ससेवाडी, केळवडे, धांगवडी येथे विनामूल्य सेवा केंद्र सुरू करणार आहे. समाविष्ट गावांचा सिटी सर्व्हे होण्याची गरज आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून या भागासाठी 20 कोटी रुपये विकास निधी उपलब्ध झाला आहे.'' 

घरकुलासाठीचे नियम व अटी अनुकूल असून, त्याची माहिती घेऊन नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तीन ते सहा, सहा ते बारा व बारा ते पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबासाठी असलेल्या घरकुल योजनांची माहिती प्रवीणकुमार देवरे यांनी दिली. कार्यकारी अभियंता नाकाडे यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या पद्धतीची माहिती दिली. जीवन कोंडे, लहुनाना शेलार, विठ्ठल आवाळे, रोहन बाठे, शैलेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी आर. आर. राठोड यांनी सूत्रसंचालन केले. सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT