Crime News Sakal
पुणे

पुणे : घरमालकीणीकडून पेईंग गेस्ट तरूणींना जबर मारहाण

पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तरुणींनी घर सोडण्याचे सांगून अनामत रक्कम मागितल्याच्या रागातुन घरमालकीणीने दोन तरूणींना घरात डांबून ठेवत त्यांना जबर मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तरुणींनी घर सोडण्याचे सांगून अनामत रक्कम मागितल्याच्या रागातुन घरमालकीणीने दोन तरूणींना घरात डांबून ठेवत त्यांना जबर मारहाण केली.

पुणे - पेईंग गेस्ट (Paying Guest) म्हणून राहणाऱ्या तरुणींनी (Girls) घर सोडण्याचे सांगून अनामत रक्कम (Deposit) मागितल्याच्या रागातुन घरमालकीणीने दोन तरूणींना घरात डांबून ठेवत त्यांना जबर मारहाण (Beating) केली. तसेच त्यांचे 15 दिवस पाणी बंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी घरमालकीणींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

तृप्ती सुर्यकांत माने, श्वेता उज्ज्वल थोरात (दोघेही रा. ओम शांती ओम पीजी गुरूकृपा, अनुसया पार्क खराडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हि शहरातील एका कॉल सेंटरमध्ये काम करते. तर तृप्ती माने हिने खराडीतील अनुसया पार्क परीसरातील तिच्या घरामध्ये मुलींना पेईंग गेस्ट म्हणून ठेवते. फिर्यादी तरुणीची चुलत बहिणी संबंधित ठिकाणी राहात असल्याने फिर्यादी दोन महिन्यापूर्वीच मानेच्या घरी राहण्यासाठी आली. तिने माने हिला भाडेस्वरुपात 3 हजार 800 रुपये आणि अनामत रक्कम म्हणून चार हजार रुपये दिले होते.

दरम्यान, माने दोन्ही तरुणींना वाईट वागणूक देत होती. महिना संपण्यापुर्वी ती दोघींकडूनही भाडे मागत होती. तिच्या त्रासाला कंटाळून दोन्ही बहिणींनी तिची खोली सोडण्याचा निर्णय घेत तिला त्याबाबत आगोदरच कल्पना दिली. दरम्यान, तरुणी खोली सोडत असल्याने मानेने 15 दिवस आगोदरच त्यांचे पाणी बंद केले. दोघीही तेथून निघून जात असतानाच माने व अन्य व्यक्तींनी प्रवेशद्वार बंद करुन दोघींनी मारहाण केली. दरम्यान, तरुणीने तिच्या मित्रास हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी दोघींची सुटका केली. त्यानंतर या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT