पुणे

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेतर्फे काम 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने विसर्जन घाटांची डागडुजी, तात्पुरते विसर्जन टॅंक बांधणे इतर कामे हाती घेतली आहेत. 

दरवर्षीप्रमाणे घाटांची डागडुजी. निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्याची कामे प्रभागस्तरावर सुरू आहेत. येथील झुलेलाल घाटाची साफसफाई केली आहे. तेथे अगोदरच मूर्तिदानासाठी हौद बांधला आहे. असाच हौद थेरगावातील घाटावर बांधला आहे. त्याला टाईल्सही बसविल्या आहेत. मुख्य घाटाच्या पायऱ्यांनजिक सिमेंटचे कट्टे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी एकाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच पूर्ण होईल. या व्यतिरिक्त घाटाच्या वरील बाजूच्या भिंतीचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. भोसरीतील धावडेवस्तीतील एका विहिरीवरही मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे. 

महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे म्हणाले, ""गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जीवरक्षकांच्या व्यवस्थेसह अग्निशमन बंब, कर्मचारी यांची व्यवस्था कोठे, किती प्रमाणात करायची यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे.'' दरम्यान, पालिकेने गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी कचरा, सजावटीचे उरलेले साहित्य, पूजेचे व इतर साहित्य जाळण्यास मनाई केली आहे. 

आकडे बोलतात 
शहरातील विसर्जन घाट - 48 
विसर्जन हौद - 32 
निर्माल्य कलश - 22 
निर्माल्य कुंड - 36 
कॉंक्रीटचे निर्माल्य कुंड - 2 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या सर्व आठ प्रभागस्तरावर कामे सुरू आहेत. यासंदर्भात आणखी एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT