pcmc school
pcmc school 
पुणे

महापालिका शाळांची पटसंख्या वाढविते "आकांक्षा' 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या काही शाळांमध्ये आठवीचे वर्ग, तर काही शाळांचा कारभार आकांक्षा फाउंडेशनकडे दिल्याने शाळांतील पटसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ती दीड हजाराने वाढली आहे. चार शाळांमध्ये शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, महापालिका राबवत असलेल्या नवीन उपक्रमांमुळे हे समाधानकारक चित्र दिसत आहे. 

महापालिकेतर्फे बालवाडी ते आठवीपर्यंतच्या मराठी, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या शाळा चालविल्या जातात. त्यासाठी प्रशस्त इमारती उभारल्या आहेत. मात्र गेल्या दहा वर्षांत महापालिकेच्या शाळांना घरघर लागल्याने दरवर्षी सुमारे हजारो विद्यार्थ्यांची गळती होत गेली. त्याचाच परिणाम म्हणून 50 हजारांहून ही पटसंख्या 37 हजारांवर घसरली. 

मोफत शालेय साहित्य, अद्ययावत वर्ग, बसायला बाके, फळे, दर्जेदार ग्रंथालय आदी सुविधा असल्या तरी प्रशासनाने गुणवत्तेकडेही लक्ष न दिल्याने विद्यार्थी संख्या घटत गेली. यंदा नियमित शिक्षणासोबत महापालिकेकडून विद्यार्थ्यांना माहिती व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. काही लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागातील शाळांमध्ये सीएसआर निधीतून डिजिटल क्‍लासरूम सुरू केले. त्यासाठी संगणक यंत्रणा दिली. तसेच विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी शिक्षकांना वर्षातून दोन वेळा कृतियुक्त प्रशिक्षण दिल्याने गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी एक हजार 585 विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने या वर्षी 39 हजार 565 पटसंख्या वाढली आहे. 

या शाळांचा शंभरने वाढला पट 
- चिखली - जाधववाडी कन्या 
- चिखली - जाधववाडी मुले 
- चिंचवड स्टेशन उर्दू शाळा 
- मोशी कन्या शाळा 

आठवीच्या वर्गांमुळे फरक 
या वर्षी 15 शाळांमध्ये प्रथमच आठवीचा वर्ग सुरू केले आहेत. परिणामी, जे विद्यार्थी सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडून जात होते, ते आता पुन्हा महापालिका शाळांमध्येच राहिले आहेत. त्यामुळेच सुमारे 450 विद्यार्थ्यांची भर पडली आहे. 

आकांक्षाच्या पटसंख्येत 255 वाढ 
थरमॅक्‍स कंपनीच्या आकांक्षा फाउंडेशनकडे महापालिकेच्या पाच शाळा चालविण्यासाठी दिल्या आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, गतवर्षी 786 पटसंख्या होती. यंदा 255 त्यात विद्यार्थ्यांची वाढ झाली असून, एकूण पट एक हजार 38 झाला आहे. 

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न आहेत. त्याचाच परिणाम म्हणून पटसंख्येत वाढ झाली आहे. 
-ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT