पुणे

नाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार?

दीपेश सुराणा

पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित नाट्यगृहांचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने नाट्य कलावंत आणि नाट्यरसिकांची गैरसोय होत आहे. प्रा. मोरे प्रेक्षागृहाचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्‍टोबर उजाडणार आहे, तर अत्रे रंगमंदिराचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.  

प्रा. मोरे प्रेक्षागृहाचे एक मेपासून नूतनीकरण सुरू आहे. हे प्रेक्षागृह नूतनीकरणासाठी मे महिन्यापासून बंद आहे. सध्या नाट्यगृहाचे प्रवेशद्वार आणि दर्शनी बाजूचे स्थापत्यविषयक काम, नाट्यगृहाची अंतर्गत सजावट, छत, स्वच्छतागृह व फ्लोअरिंगची दुरुस्ती, ॲटोमॅटिक वातानुकूलित व्यवस्था, रंगमंच सुधारणा, अग्निशमन यंत्रणा, ध्वनिव्यवस्था, पडदे, सौरऊर्जा यंत्रणा, कॅफे टेरिया, कलाकारांच्या ग्रीनरूमचे नूतनीकरण आदी कामे सुरू आहेत. नाट्यगृहाची दर्शनी बाजू आकर्षक करण्यासाठी काही म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी दिलेली चार महिन्यांची मुदत संपलेली आहे. अद्याप मोठ्या प्रमाणावर काम शिल्लक आहे. 

अत्रे रंगमंदिर हे वीस वर्ष जुने आहे. येथील खुर्च्या, स्वच्छतागृहे आदी भौतिक सुविधांची दुरवस्था झाली होती. नाट्यगृहात विविध सुविधा देण्यासाठी २४ ऑगस्ट २०१७ पासून नूतनीकरणाला सुरवात झाली. नवीन खुर्च्या, फॉल्स, सीलिंगचे काम, रंगमंचावरील मंडपी, स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा आदी कामे सुरू आहे. त्याशिवाय, इलेव्हेशन, लॉबीचा विस्तार, कलाकारांसाठी ग्रीनरूम, नाट्यगृहाचे अंतर्गत काम करण्यात येत आहे. जानेवारी २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुदत आहे.

प्रा. मोरे प्रेक्षागृह आणि अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. गदिमा नाट्यगृहाचे कामही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तीनपैकी एका नाट्यगृहाचे काम तातडीने पूर्ण करावे. निळू फुले रंगमंदिर, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाचे भाडेदर जास्त आहे. त्यामुळे ते परवडत नाही.
- डॉ. संजीवकुमार पाटील, नाट्य अभिनेते

आचार्य अत्रे रंगमंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी चार महिन्यांची मुदत आहे. मात्र, हे काम दीड महिन्यातच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- संजय घुबे, कार्यकारी अभियंता 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT