pune district bank Sakal
पुणे

PDCC Bank : पगारदार खातेदारांचा १० लाखांचा मोफत विमा

राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये पगारदार खात्यांसाठी असलेले अपघात विम्याचे मोफत कवच आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) पगारदार खातेदारांना मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये पगारदार खात्यांसाठी असलेले अपघात विम्याचे मोफत कवच आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) पगारदार खातेदारांना मिळणार आहे. याचा लाभ बिगर कर्जदार आणि कर्जदार या दोन्ही प्रकारच्या पगारदार खातेदारांना दिला जाणार आहे ‌यानुसार पगारदार खातेदारांना १० लाख रुपयांचे मोफत विमा कवच दिले जाणार आहे.

याशिवाय दहा लाखांहून अंधिक आणि कमाल तीस लाख रुपयांचा अपघात विमा घेण्याची सुविधा पगारदार खातेदारांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र दहा लाखांपर्यंतच्या रकमेचा विमा हप्ता जिल्हा बॅंक भरणार असून, त्यापुढील रकमेचा विमा हप्ता खातेदारांना भरावा लागणार आहे. ही सुविधा फक्त बिगर कर्जदार पगारदार खातेदारांपुरती मर्यादित असून कर्जदार पगारदार खातेदारांना विमा हप्त्याची केवळ २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

जिल्हा बँकेच्या नुकताच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. पगारदार खातेदारांसाठी मोफत अपघात विम्याचे कवच उपलब्ध करून देण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांनी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्याकडे सुमारे वर्षभरापूर्वी केली होती. पुणे जिल्हा बँकेच्या आधी नगर जिल्हा बँकेने ही विमा योजना सुरु केली आहे. त्यामुळे आता नगर जिल्हा बँकेच्या धर्तीवर पुणे जिल्हा बँकेतही ही विमा योजना सुरु झाली आहे.

या विमा योजनेमुळे पगारदार खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबीयांना या विम्याच्या माध्यमातून किमान १० लाख रुपयांची रक्कम मिळू शकणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे बॅंकेत पगार खाते असते, अशा पगारदार खातेदारांसाठी विम्याचे मोफत कवच बॅंकेकडून दिले जाते. सध्या ही योजना केवळ राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये चालू आहे. पुणे जिल्हा बॅंकेनेही याआधी दोन वेळा हा प्रयोग केला होता. परंतु दोन्ही वेळा तो फसला होता.

या विमा योजनेचे फायदे

या विमा योजनेंतर्गत किमान १० ते कमाल ३० लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळू शकतो.

- यानुसार मृत्यू झाल्यास १० ते ३० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळू शकणार

- कायम अपंगत्व आल्यास १५ ते २५ लाख रुपये मिळणार

- अंशतः अपंगत्व आल्यास १० ते २० लाख रुपये मिळण्याची सोय

जिल्हा बँकेच्या वतीने राष्ट्रीयकृत बँकांच्या धर्तीवर मोफत विम्याचे कवच उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षकांसह विविध कर्मचारी संघटनांनी केली होती. त्यानुसार यासंदर्भात विविध कर्मचारी संघटनांची बैठक घेतली आणि त्यांच्याकडून प्राप्त सुचनांचा विचार करून ही योजना ही विमा योजना तयार केली आहे. याचा सुमारे १५ हजारांहून अधिक खातेदारांना फायदा होणार आहे.

- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बँक, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT