ajit pawar  Esakal
पुणे

'मी धाडस दाखवलं आणि उभा राहिलो', अजित पवारांनी सांगितला किस्सा

सकाळ डिजिटल टीम

गर्दी झाली की त्याचे फोटो व्हायरल होतात, मग केसेस दाखल कराव्या लागतात असं पुणे जिल्हा बँकेच्या प्रचार मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले.

पुणे - पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचार मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच उद्घाटनाचे कार्यक्रम इत्यादीला होणारी गर्दी टाळा असंही त्यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांकडून इतर राज्यात चालतं पण इथं का नाही असं विचारलं जातं. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, काही राज्यात निवडणुका होतात तिथं कसं चालतं, तुमच्या मनात अशी शंका येणं साहजिक आहे. पण आपण गांभीर्याने घ्यायला हवं. अनेकजण भेटतात आणि सांगतात की तुमच्यासाठी उद्घाटन थांबवलं आहे असं सांगतात. कार्यालयाचे उद्घाटन सांगितल्याचं बरेच जण सांगतात.

पुणे जिल्हा बँकेच्या प्रचार मेळाव्यात अजित पवार बोलत म्हणाले की, हॉटेलचं उद्घाटन थांबवलं आहे असं बरेच जण सांगतात. मलाही तिथं जायला आवडेल पण मी तिथं गेल्यावर गर्दी होणार. अलिकडे सोशल मीडिया किती अॅक्टिव्ह आहे माहितीय. गर्दी झाली की त्याचे फोटो व्हायरल होतात, मग केसेस दाखल कराव्या लागतात. आम्ही केस दाखल करतो मग आता आमच्यावर कोण केस दाखल करणार? मग प्रश्नही निर्माण होतो की यांच्यावर केस होणार का? म्हणून आम्ही मुरड घालतो. पण तरीही उद्घाटनासाठी पत्रं येतात. पण खरंतर उद्घाटनासाठी नका थांबू, काम सुरु करा. आपण सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी त्यांच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कसे आलो याचाही किस्सा सांगितला. ते म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण भागात बँका या आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जातात. १९९१ मध्ये स्वर्गीय सुभाष अण्णा कूल यांनी सांगितलेलं की, अजित पवार तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणात यायचं असेल तर पुणे जिल्हा बँकेला बारामतीतून उभे रहा. तिथे काकडे परिवाराचं वर्चस्व होतं. त्यामुळे इथं उभा राहायला इच्छूक नसायचे. मी धाडस दाखवलं आणि उभा राहिलो आणि बँकेवर निवडून आलो. गेल्या ३० वर्षांत बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT