ajit pawar PDCC Bank ajit pawar
पुणे

PDCC Bank | जिल्हा बॅंकेवर तीन मंत्र्यांसह १४ जण बिनविरोध

ओमकार वाबळे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC) पंचवार्षिक निवडणुकीत तीन मंत्र्यांसह १४ जण बिनविरोध झाले आहेत. केवळ याबाबतची अधिकृत घोषणा बाकी राहिली आहे. या तीन मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित सात जागांसाठी १४ जण निवडणूक रिंगणात उरले आहेत. भाजपला केवळ तीन जागांवर उमेदवार देण्यात यश आले आहे. या सात जागांसाठी येत्या २ जानेवारीला निवडणूक होणार असून, ४ जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे. (PDCC Bank Election)

जिल्ह्यातील हवेली, मुळशी आणि शिरूर या तीन तालुक्यातील अ वर्ग मतदारसंघात आणि ड वर्ग मतदारसंघात दुहेरी लढत होत आहे. याशिवाय क वर्ग व महिला राखीव मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. निवडणूक रिंगणात आमदार अशोक पवार (शिरूर), पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (हवेली), जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रकाश म्हस्के (हवेली), आत्माराम कलाटे (मुळशी), दिगंबर दुर्गाडे (पुरंदर), जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या आशा बुचके आदी प्रमुख उमेदवार उरले आहेत.

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. या जागांसाठी १६० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सात डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यानंतर ८ डिसेंबरपासून अर्ज माघारी घेण्यास सुरवात झाली होती. बुधवारी (ता.२२) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. आज दिवसभरात ३४ जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.

बिनविरोध झालेल्यांमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रेय भरणे यांच्यासह आमदार संजय जगताप संग्राम थोपटे, दिलीप मोहिते, बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात, संजय काळे, अप्पासाहेब जगदाळे, ज्ञानोबा दाभाडे, रेवणनाथ दारवटकर, प्रवीण शिंदे, संभाजी होळकर आणि दत्तात्रेय येळे यांचा समावेश आहे.

थोरात सलग आठव्यांदा बॅंकेवर

जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात हे सलग आठव्यांदा जिल्हा बॅंकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे थोरात हे पुन्हा एकदा बॅंकेचे सर्वात ज्येष्ठ संचालक ठरले आहेत. विद्यमान संचालक मंडळातही थोरात हेच ज्येष्ठ संचालक होते. ते मागील ३५ वर्षांपासून सलग निवडून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT