पुणे

शेंगदाण्याचा बाजारात तुटवडा

CD

प्रवीण डोके
मार्केट यार्ड, ता. २२ : राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांत शेंगदाण्याच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. उत्पादन घटल्याने बाजारातील पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, शेंगदाण्याच्या दरात प्रति किलो ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात प्रतवारीनुसार शेंगदाण्याचे दर ११२ ते १६५ रुपयांदरम्यान पोहोचले असून ग्राहकांवरही त्याचा परिणाम जाणवत आहे.
हवामानातील बदल, पाण्याची टंचाई आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ याचा थेट परिणाम उत्पन्नावर झाला आहे. त्याचबरोबर बाहेरील बाजारातून होणारी आवक मंदावल्याने स्थानिक बाजारपेठेत पुरवठा कमी पडत आहे. मागणी कायम असताना तुटवडा निर्माण झाल्याने दरात वाढ होत आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातून शेंगदाण्याची आवक होत आहे. भुसार बाजारात दररोज साधारण ८० ते १०० वाहनांची आवक होत आहे. राजस्थान, गुजरातमधील शेंगदाणा संकरित (हायब्रीड) आहे. शेंगदाणा दरातील तेजी दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश ही राज्ये मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतातच शेंगदाणा पाठवितात. त्यामुळे महाराष्ट्रात अधिक प्रमाणात आवक होत नाही. शेंगदाण्याला तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मागणी असून शेंगदाणा तेलाचा वापर वाढलेला आहे. यामुळे भाव कमी होणार नसल्याची शक्यता व्यापारी अशोक लोढा यांनी वर्तविली आहे.


भारतातून निर्यात
भारत हा जगातील प्रमुख शेंगदाणा उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक आहे. देशातील गुणवत्तापूर्ण व मोठ्या आकाराच्या शेंगदाण्याला अनेक देशांत मोठी मागणी आहे. भारतातून इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, थायलंड यासह काही देशांत निर्यात केली जाते.


शेंगदाण्याच्या दरातील सध्याची तेजी ही केवळ तात्पुरती नाही तर उत्पादन घट, वाढती मागणी आणि जागतिक बाजारातील बदल यांचा एकत्रित परिणाम आहे. घरात आणि हॉटेलसह खाद्यपदार्थ तयार करण्यात येणाऱ्या विविध केंद्रांवर शेंगदाणा तेलाचा वापर वाढला आहे. ग्राहकांकडून शेंगदाणाला कायम मागणी होत आहे. त्यामुळे शेंगदाणाचे भाव वाढलेले आहेत.
- गणेश चोरडिया, व्यापारी, मार्केट यार्ड


भाववाढीची कारणे
- भुईमूग लागवड क्षेत्रात झालेली घट
- गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर शेंगदाणा निर्यात
- भुईमूग उत्पादक राज्यात हवामानातील बदल
- जास्तकाळ रेंगाळलेला पाऊस
- बाजारात शेंगदाण्याचा पुरवठा कमी
- तेल उत्पादक कंपन्यांकडून मागणी


घाऊक बाजारातील भाव
प्रकार - दर (२०२५) - दर (२०२६)
घुंगरू - ९० ते १०० - १३५ ते १४५
स्पॅनिश - ११० ते ११७ - १५५ ते १६५
जाडा - ९० ते १०० - ११२ ते १२०
टिजे - ७२ ते ७५ - ११२ ते ११५


भारतातून होणारी निर्यात (आकडेवारी)
वर्ष - मेट्रिक टन - निर्यात मूल्य (कोटी रुपयांत)
२०२१ - २२ - ५१४,१६३ - ४,६९७
२०२२ - २३ - ६६८,८८५ - ६,७३५
२०२३ - २४ - ६८०,६९८ - ७१३४
२०२४ - २५ - ७४६,३०३ - ६७२८
२०२५ - २६ (एप्रिल ते नोव्हें) - ४५२,५३४ - ३९३५
(निर्यात सोर्स - अपेडा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC : फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी! श्रीलंकेची सुपर ८च्या पहिल्याच सामन्यात जबदरस्त कामगिरी

Solapur District Dams: साेलापूर जिल्ह्यातील धरणे होणार आता गाळमुक्त; २१२ पैकी १६५ धरणांतून तीन वर्षांत काढला ११६ दलघमी गाळ!

Mumbai-Pune: मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना टोलचे पैसे परत मिळणार; पण कधी? जाणून घ्या...

संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Satej Patil: झिरवळांच्या कार्यालयात ACB ची धाड, फडणवीसांच्या परवानगी शिवाय नाही; अधिवेशनापूर्वी सतेज पाटलांनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT