shenga 12.JPG
shenga 12.JPG 
पुणे

घाऊक बाजारात शेंगदाणा महागला

सकाळ वृत्तसेवा

पुणे :  श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे साबूदाणा आणि शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने घाऊक बाजारात साबूदाण्याच्या भावात पंधरा दिवसांत किलोमागे 5 रुपयांनी घसरण झाली आहे. तर, शेंगदाण्याच्या भावात सात रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली. 
देशात केवळ तमिळनाडू येथील सेलम भागात साबूदाण्याचे उत्पादन घेतले जाते. लोढा म्हणाले की, मार्केट यार्डातील भुसार विभागात दररोज 150 ते 200 टन साबूदाणा दाखल होत आहे. श्रावण महिना सुरू झाल्याने मागणीत नेहमीच्या तुलनेत 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. नवरात्रीपर्यंत साबूदाण्याला मागणी राहणार आहे.
सध्या मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने भावात घसरण झाली आहे. भावात चढ-उतार होण्याची शक्‍यता आहे. घाऊक बाजारात 1 नंबर साबूदाण्याला किलोस 78 रुपये, दोन नंबर साबूदाण्याला 75 रुपये, तीन आणि चार क्रमांक साबूदाण्याला अनुक्रमे 70 आणि 68 रुपये भाव मिळत आहे. 
तर शेंगदाण्याविषयी ते म्हणाले की, शेंगदाण्यालाही मागणी वाढली आहे. मात्र, सध्या खराब माल बाजारात जास्त येत आहे. आवक पैकी केवळ 10 टक्के मालच चांगला आहे. मध्य प्रदेश येथून येणारा मेनपुरी शेंगदाणा सध्याच्या वातावरणात केवळ चार दिवसांत खराब होत आहे. बाजारात सध्या दररोज 150 ते 200 टन शेंगदाण्याची मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगाल आणि कर्नाटकातून आवक होत आहे. घाऊक बाजारात हलक्‍या मालाला किलोस 80 ते 85 रुपये, तर दर्जेदार मालास 110 ते 120 रुपये भाव मिळत आहे. भावातील तेजी दसऱ्यापर्यंत राहण्याचा अंदाजही लोढा यांनी वर्तविला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT