Peddlers Sakal
पुणे

पथारी व्यावसायिक ‘रस्त्यावर’; पुणे महापालिकेकडून दंडासह शुल्क भरण्याच्या नोटिसा

कोरोनामुळे आणि लॉकडाउनमुळे पथारी व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहेच, त्यातच आता अतिक्रमण विभागाने व्यावसायिकांना शुल्क भरण्यासाठी नोटिसा पाठविल्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे (Corona) आणि लॉकडाउनमुळे (Lockdown) पथारी व्यावसायिकांवर (Peddlers) आर्थिक संकट (Economic Crisis) ओढवले आहेच, त्यातच आता अतिक्रमण विभागाने व्यावसायिकांना शुल्क भरण्यासाठी नोटिसा (Notice) पाठविल्या आहेत. त्यामध्ये दंडाची (Fine) रक्कम व त्यावर व्याजदेखील लावण्यात आल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. यामधून महापालिकेला (Municipal) सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. (Peddlers Fine Notice by Pune Municipal)

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावताना त्यामध्ये दैनंदिन शुल्क यासह विलंब झाल्याने दंड व त्यावर व्याज लावले आहे. त्यामुळे या पथारी व्यावसायिकांना १५ हजारपासून ते ८० हजार रुपयांपर्यंतच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.

आधीच आर्थिक संकट असताना दुसरीकडे महापालिकेने नोटिसा बजावल्याने नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्थायी समितीने भाडे व दंड पूर्ण माफ करावा अशी असा ठराव दिला. त्यावर आता प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. धेंडे म्हणाले, ‘गेले वर्षभर सर्वच पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय बंद होते, केवळे भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करता आला. असे असताना महापालिकेने या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा विचार केला पाहिजे. पण उलट त्यांना दंड व व्याज लावून नोटिसा दिल्या आहेत. यात सवलत मिळाली पाहिजे.’

अशी आहे स्थिती

  • पुणे शहरामध्ये महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी

  • अधिकृत पथारी व्यावसायिकांचे दैनंदिन शुल्क निश्‍चित

  • सध्या शहरात अधिकृत ४८ हजार ५०० पथारी व्यावसायिक आहेत

  • वर्गवारीनुसार दैनंदिन २५ ते १०० रुपयांपर्यंत शुल्क

  • कोरोना लाट आटोक्यात आल्यानंतर काही काळ व्यवसाय करायची संधी

  • मार्च २०२० पासून लॉकडाउन सुरू झाल्याने बाजारपेठ बंद

  • याचा आर्थिक फटका पथारी व्यावसायिकांना बसला आहे; अनेकांची आर्थिक स्थिती गंभीर

  • महापालिकेकडून २०१९-२० या वर्षाचे शुल्क भरण्यासाठी नोटिसा

कोरोनामुळे नुकसान झालेले असताना त्यात परत महापालिकेने नोटीस बजावून व्याज, दंडासह शुल्क वसुली सुरू केली आहे. उलट महापालिकेने अशा अडचणीच्या कालावधीमध्ये हातावरचे पोट असणाऱ्या व्यावसायिकांना आधार देणे आवश्‍यक होते. फेरीवाला धोरणाच्या वर्गवारीनुसार व्यावसायिकांना १५ हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत रक्कम भरण्यास सांगितली आहे. ही अन्यायकारक वसुली थांबविली पाहिजे.

- बाळासाहेब मोरे, सचिव, पथारी व्यावसायिक पंचायत

२०१९-२० मध्ये पथारी व्यावसायिकांनी शुल्क न भरल्याने त्यांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. शुल्क भरण्यास उशीर झाल्याने दंडही लावण्यात आलेला आहे. यामधून महापालिकेला किमान १२ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या नोटिसा नियमाप्रमाणे पाठविण्यात आलेल्या आहेत.

- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT